चिंचवड -ऑटो क्लस्टर ऑडिओ टोरीयम चिंचवड येथे एमआयडीसी कॅन्टीन मेळावा संपन्न झाला हा मेळावा कॅन्टीन धारकाच्या मूलभूत समस्यांसाठी आणि स्टार्टअप उद्योग आणि उद्योग विस्तार या विषयावर आधारित होता मेळाव्याचे प्रमुख पाहुणे महानगरपालिका उपायुक्त अण्णा बोदडे तसेच जिल्हा उद्योग केंद्राच्या उपसंचालक शैलजा वानखेडे उद्योजक वैभव जगताप महानगरपालिकेचा समाज विकास कल्याण विभागाच्या तसेच महानगरपालिका आणि शासनाचे पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यात मोठ्या संख्येने एमआयडीसी परिसरातील कॅन्टीन धारक महिला लघुउद्योजक संख्येने होत्या यावेळी एमआयडीसी कँटीन असोसिएशनचे अध्यक्षअभय भोर यांनी एमआयडीसीतील कॅन्टींग धारकांच्या समस्या मांडल्या एमआयडीसी परिसरात पूर्वीपासून अनेक कॅन्टीन व्यवसायिक आहेत परंतु नव्याने अनेक भागांमध्ये नवीन टपऱ्या येऊन पडत असून या अनेक टपऱ्यांमध्ये अनाधिकृत व्यवसायही चालू झाले असून अनेक लोकांनी अनाधिकृत टपरे टाकून भाड्याने देण्याचे काम चालू केले आहे त्यामुळे मूळ व्यवसाय कॅन्टीन यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगितले तसेच स्टार्टअप उद्योग महिलांसाठी पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या संख्येने आहेत आणि अनेक महिलांनी शासनाच्या योजना घेऊन आपले छोटे लघुउद्योग निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा असोसिएशन तर्फे अनेक महिला भगिनींना उद्योगासाठी पूर्णतः मदत केली जाईल असे सांगितले यावेळी महा उपायुक्त अण्णा बोदडे यांनी महानगरपालिकेच्या विभागाच्याविविध योजनांची माहिती दिली आणि महानगरपालिकेतर्फे कायम सहकार्याची भूमिका असून शहरांमध्ये रोजगार निर्मितीला भर दिला जाईल असे सांगितले जिल्हा उद्योग केंद्राच्या उपसंचालक शैला वानखेडे यांनी जिल्हा उद्योग केंद्र च्या योजनांची माहिती या ठिकाणी दिली तसेच श्रीम. संतोषी सुदाम चोरघे समाजसेवक श्रीम.नम्रता रणसिंग समाजसेवक सामाजिक आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या योजना देखील या ठिकाणी सांगितल्या व प्रवीण मोरे उद्योग उपसंचालक जिल्हा उद्योग केंद्र पुणे उपस्थित होते व पिंपरी चिंचवड महिला लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष दुर्गा भोर यांनी महिलांना व्यावसायिक मार्गदर्शन केले
एमआयडीसी कॅन्टीन असोसिएशन मेळावा संपन्न..
RELATED ARTICLES
New Delhi
haze
24.1
°
C
24.1
°
24.1
°
43 %
2.1kmh
0 %
Mon
27
°
Tue
28
°
Wed
27
°
Thu
26
°
Fri
26
°