28.4 C
New Delhi
Wednesday, July 2, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानएलआयसी म्युच्युअल फंडने मल्टी अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंड केला लाँच

एलआयसी म्युच्युअल फंडने मल्टी अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंड केला लाँच

पुणे, : भारतातील प्रतिष्ठित फंड घराण्यांपैकी एक असलेल्या, एलआयसी म्युच्युअल फंडाने, एलआयसी एमएफ मल्टी अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंड प्रस्तुत केला आहे. ही एक गुंतवणुकीस कायम खुली (ओपन-एंडेड) असणारी योजना असून, जी समभाग (इक्विटी), रोखे (डेट) आणि सोन्यांत गुंतवणूक करेल.

नवीन फंड प्रस्तुती (एनएफओ) २४ जानेवारी २०२५ रोजी सुरू होईल आणि ७ फेब्रुवारी २०२५ रोजी ती बंद होईल. या योजनेचे गुंतवणूक उद्दिष्ट समभाग आणि समभागांशी संलग्न साधनांच्या विविध पोर्टफोलिओमध्ये, रोखे आणि मनी मार्केट साधनांमध्ये तसेच गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडाच्या (गोल्ड ईटीएफ) युनिट्समध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवलवृद्धी करण्याचे आहे.

या योजनेचा मानदंड हा ६५ टक्के निफ्टी ५०० टीआरआय + २५ टक्के निफ्टी कंपोझिट डेट इंडेक्स + देशांतर्गत सोन्याची १० टक्के किंमत यांचे संयोजन असा आहे. श्री. निखिल रुंगटा, श्री. सुमित भटनागर आणि श्री. प्रतीक श्रॉफ हे योजनेचे निधी व्यवस्थापक असतील. ही योजना १८ फेब्रुवारी २०२५ रोजी निरंतर विक्री आणि पुनर्खरेदीसाठी पुन्हा खुली होईल.

नवीन योजनेवर भाष्य करताना, एलआयसी म्युच्युअल फंड अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आर.के. झा म्हणाले: “मल्टी-अ‍ॅसेट अॅलोकेशन फंड हे आजकाल अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. कारण ते एकाच मालमत्तेतील केंद्रीकरणाची जोखीम कमी करतात आणि गुंतवणुकीत चांगले वैविध्य राहिल हे पाहतात. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (अॅम्फी) ने प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये हायब्रिड म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत (एयूएम) २७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही मालमत्ता जानेवारी २०२४ मध्ये ₹६.९० लाख कोटी होती, ती डिसेंबर २०२४ मध्ये ₹८.७७ लाख कोटी झाली आहे. विशेष म्हणजे, हायब्रिड श्रेणी अंतर्गत मल्टी-अ‍ॅसेट अॅलोकेशन फंडाच्या मालमत्तेत लक्षणीय वाढ दिसून आली आहे. यातून गुंतवणूकदारांचे सध्या हायब्रिड फंडांकडे आकर्षण स्पष्टपणे दिसून येत आहे आणि आमचा नवीन फंड त्यांच्या हितसंबंधांच्या पूर्ततेसाठी निश्चितच आदर्श आहे.”

एलआयसी म्युच्युअल फंड अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेडचे सह-मुख्य गुंतवणूक अधिकारी – समभाग श्री. निखिल रुंगटा म्हणाले मल्टी-अ‍ॅसेट अॅलोकेशन फंड हा एक असा उपाय आहे जो वाढीसाठी समभागांची शक्ती, रोख्यांद्वारे उत्पन्न निर्मिती आणि कमोडिटीजची कणखरता यांचे उत्तम संयोजन साधतो. अस्थिर काळात वाढीच्या संधींसाठी हा फंड एक संतुलित मार्ग प्रदान करतो. जे गुंतवणूकदार एकाच वेळी सर्व तीन मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक करू इच्छितात आणि शुद्ध समभागसंलग्न (इक्विटी) योजनांपेक्षा तुलनेने कमी अस्थिरता असलेल्या योजनेच्या शोधात असणारे या योजनेत गुंतवणूक करू शकतात. बाजाराचा दीर्घकालीन दृष्टीकोन तेजीचा आहे हे सुस्पष्टच आहे आणि हा नवीन फंड सर्व गुंतवणूकदारांना या लाटेवर स्वार होण्याची संधी देत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
28.4 ° C
28.4 °
28.4 °
77 %
2.7kmh
21 %
Wed
38 °
Thu
40 °
Fri
38 °
Sat
36 °
Sun
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!