पुणे: डीएसपी म्युच्युअल फंडाने डीएसपी बीएसई सेन्सेक्स नेक्स्ट ३० इंडेक्स फंड index fund आणि डीएसपी dcp bseबीएसई सेन्सेक्स नेक्स्ट ३० ईटीएफ या दोन नवीन फंडांचा शुभारंभ करत असल्याची घोषणा केली आहे. बीएसई सेन्सेक्स नेक्स्ट ३० या निर्देशांकाचा मागोवा घेणाऱ्या या योजना मुदतमुक्त श्रेणीतील आहेत. गुंतवणूकदारांना बीएसई सेन्सेक्स निर्देशांकानंतर असलेल्या नेक्स्ट ३० निर्देशांकातील ३० सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी प्रदान करणे, हा या योजनांचा उद्देश आहे. या कंपन्या वाढीसाठी सज्ज असून आगामी काळात उदयास येणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांच्या त्यांचा समावेश असेल, असा अंदाज आहे.
बीएसई सेन्सेक्सचा भाग नसलेल्या परंतु बाजार भांडवलीकरणात लक्षणीय ताकद आणि भविष्यातील वाढीची क्षमता दर्शविणाऱ्या कंपन्यांचा बीएसई सेन्सेक्स नेक्स्ट ३० या निर्देशांकात समावेश आहे. हा निर्देशांक लार्ज कॅप विश्वातील मध्यम क्षमतेच्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित करून एक वेगळेपणा आणतो. या विभागात काही सर्वात वेगाने वाढणाऱ्या लार्ज कॅप लीडर आणि आव्हान निर्माण करण्याची क्षमता असलेल्या कंपन्या आहेत, परंतु सध्याच्या लार्ज कॅप निर्देशांकांमध्ये या कंपन्यांना केवळ १० ते ४० टक्केच प्रतिनिधीत्व असल्याने त्या पुरेशा प्रमाणात त्यांच्या गटाचे प्रतिनिधित्व करु शकत नाही, असे चित्र आहे.
हा निर्देशांक विविध कंपन्यांना प्रतिनिधीत्व देऊन विविधता प्रदान करतो. त्यामुळे गुंतवणूकदारांना विविध क्षेत्रातील उदयोन्मुख बाजारपेठेतील आघाडीच्या कंपन्यांत
गुंतवणूकीची संधी मिळते. बीएसई सेन्सेक्समध्ये वित्तीय सेवा कंपन्यांचा ३८ टक्के हिस्सा असून त्यातुलनेत या निर्देशांकात अशा कंपन्यांचा हिस्सा केवळ १९ टक्के आहे, तर ग्राहकपयोगी वापर आणि वस्तू यांचा वाटा प्रत्येकी १८ टक्के आहे. या निर्देशांकात ऊर्जा (१०%), आरोग्यसेवा (१०%), एफएमसीजी (८%) आणि औद्योगिक (८%) असे अन्य क्षेत्राचे प्रमाण असून तो त्यांना योग्य प्रमाणात प्रतिनिधीत्व करण्याची संधी देतो. त्यामुळे गुंतवणूकदारांना दर्जेदार लार्ज-कॅप कंपन्यांचा उत्तम आणि वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ साकारण्याची संधी मिळते.*
बीएसई सेन्सेक्स नेक्स थर्टी निर्देशांकाने ३१ डिसेंबर २०२४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार गत दहा वर्षांत वार्षिक १४.४ टक्के परतावा दिलेला आहे. परताव्याच्या बाबतीत या निर्देशाकांने बीएसई सेन्सेक्स निर्देशांकाच्या तुलनेत गत दहा वर्षांत सात वेळा सरस कामगिरी बजावलेली आहे. *
नवीन फंडाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना डीएसपी अॅसेट मॅनेजर्सच्या पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट्स आणि प्रोडक्ट्स विभागाचे प्रमुख आणि सीएफए अनिल घेलानी म्हणाले, ” “सध्या, लार्ज कॅप हा समभाग विभाग जोखीमेच्या तुलनेत परताव्याचा बाबतीत योग्य पातळीवर वाटचाल करत आहे. आमच्या या नवीन फंडांमुळे याच विभागातील वेगळ्या गटात गुंतवणूकची संधी मिळते. बीएसई सेन्सेक्स नेक्स्ट ३० निर्देशांकात समाविष्ट असलेल्या कंपन्या ऐतिहासिकदृष्ट्या संपत्ती निर्मितीत अतिशय सक्षम आहेत. या गटातील २० समभागांना गेल्या दशकात बीएसई सेन्सेक्समध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. अन्य प्रमुख लार्ज कॅप निर्देशांकाशी असलेला अल्प संबंध विचारात घेता, हा फंड दीर्घकालीन गुंतवणूकीचा दृष्टीकोन असलेल्या सर्व गुंतवणूकदारांसाठी योग्य पर्याय आहे. त्याचबरोबर अन्य लार्ज कॅप इंडेक्स फंडांमध्ये यापुर्वी गुंतवणूक केलेल्या परंतु आता किंचित वेगळ्या प्रकारची गुंतवणूक करु इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सुध्दा हा फंड उत्तम पर्याय आहे.”
डीएसपी बीएसई सेन्सेक्स नेक्स्ट ३० इंडेक्स फंड आणि डीएसपी बीएसई सेन्सेक्स नेक्स्ट ३० ईटीएफ हे दोन नवीन फंड (एनएफओ) गुंतवणूकीसाठी येत्या १०
जानेवारी ते २४ जानेवारी २०२५ दरम्यान खुले राहणार आहेत. या फंडात गुंतवणूकदार एकरकमी गुंतवणूक करु शकतील किंवा आपल्या आर्थिक उद्दीष्ट्यांनुसार नियमित गुंतवणूक योजनेच्या (एसआयपी) माध्यमातूनही गुंतवणूक करू शकणार आहेत.