20.1 C
New Delhi
Sunday, December 1, 2024
Homeमाहिती तंत्रज्ञाननिफ्टी टॉप टेन इक्वल वेट इंडेक्सची शेअरबाजारात सोळापैकी 9 वर्षात चमकदार कामगिरी

निफ्टी टॉप टेन इक्वल वेट इंडेक्सची शेअरबाजारात सोळापैकी 9 वर्षात चमकदार कामगिरी

स्मॉल, मिड कॅपमध्ये मूल्यांकन उच्च पातळीवर असताना, डीएसपी म्युच्यूअल फंडातर्फे निफ्टी टॉप टेन इक्वल वेट इंडेक्सवर आधारित भारतातील पहिला फंड

पुणे : DSP म्युच्युअल फंडने भारतातील पहिला निफ्टी टॉप 10 इक्वल वेट इंडेक्स फंड आणि ईटीएफ लॉन्च केला आहे, जो निफ्टीमधील फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशनच्या आधारावर टॉप 10 भारतीय कंपन्यांमध्ये समान प्रमाणात गुंतवणूक करतो. DSP निफ्टी टॉप 10 इक्वल वेट इंडेक्स फंड आणि DSP निफ्टी टॉप 10 इक्वल वेट ईटीएफचा उद्देश पि/ई रेशियो, रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन अस्टेस सारख्या मेट्रिक्सच्या आधारे निफ्टी 50 आणि निफ्टी 500 च्या तुलनेत टॉप 10 स्टॉक्सच्या तुलनात्मकरीत्या चांगल्या मूल्यांकनाचा फायदा घेणे आहे.

विविध कालावधीत बदललेल्या मूल्यांकनाआधारे तसेच दीर्घ कालावधीत निफ्टी टॉप टेन इक्वल वेटेज निर्देशांकाने निफ्टी फिफ्टी आणि निफ्टी 500 या दोन निर्देशांकाच्या तुलनेत सरस कामगिरी बजावलेली आहे. मागील सोळापकी नऊ वर्षांत निफ्टी टॉप टेन इक्वल वेटेज निर्देशांकाने जबरदस्त कामगिरी केलेली आहे. एकूण बाजारमूल्याच्या टक्केवारीच्या तुलनेत आघाडीच्या दहा समभागांचा अधिभार हा सर्वकालीन निच्चांकी पातळीवर असल्याने सध्या आघाडीच्या दहा कंपन्या या योग्य मूल्यांकन पातळीवर आहेत. बाजारातील अन्य निर्देशांकाच्या तुलनेत आघाडीच्या दहा समभागांची कामगिरी निराशाजनक राहिलेली आहे. परंतु आकडेवारी* असे दशवितो की, तीन वर्षासाठीचा ऐतिहासिक अल्फा गुणोत्तर ज्यावेळी उणे पातळीवर असतो, त्यावेळी निफ्टी टॉप टेन इक्वल वेट इंडेक्ससाठी आगामी काळातील अल्फा गुणोत्तर हे धन पातळीवर असते. यातून या समभागांच्या मूल्याकंनात वाढीचे स्पष्ट संकेत मिळतात.

पोर्टफोलिओच्या गुणवत्तेनुसार, निफ्टी 500 इंडेक्सच्या तुलनेत निफ्टी टॉप टेन इक्वल वेटेज इंडेक्समधील समभागांवर दीड पट अधिक परतावा मिळालेला आहे**. वित्तीय वर्ष 2024 च्या आकडेवारीनुसार निफ्टी फिफ्टीचा सुमारे 49 टक्के नफा हा निफ्टी टॉप टेन इक्वल वेट इंडेक्सच्या समभागांनी मिळवून दिलेला आहे.

डिएसपी निफ्टी टॉप टेन इक्वल वेट इंडेक्स फंड आणि डिएसपी निफ्टी टॉप टेन इक्वल वेट इंडेक्स इटीएफ हे दोन फंड प्राथमिक गुंतवणूकीसाठी येत्या 16 ऑगस्ट 2024 ला खुले होणार असून येत्या 30 ऑगस्ट 2024 ला बंद होणार आहेत.

नवीन फंडाबद्दल बोलताना डीएसपी म्युच्युअल फंडांच्या पॅसिव्ह इनव्हेस्टमेंटस् आणि प्रॉडक्टचे प्रमुख आणि सीएफए अनिल घेलानी म्हणाले. “आम्ही स्मॉल आणि मिड-कॅप समभागांमध्ये गुंतवणूकदारांचा वाढता ओढा बघत असताना, खूप मोठे आणि मेगा कॅप समभाग तुलनेने अधिक आकर्षक मूल्यांकन पातळीवर वाटचाल करताना दिसतात. योग्य गुंतवणूक तत्त्वे असे सुचवतात की, जेथे तुलनेने कमी मूल्यमापन आणि सुरक्षिततेचे मार्जिन आहे, तेथे गुंतवणूक करणे नेहमीच चांगले असते. म्हणून, आम्ही समान अधिभार धोरणात सर्वात मोठे दहा समभाग असणाऱा निर्देशांक विचारात घेतला आहे. निफ्टी टॉप टेन इक्वल वेट इंडेक्स हा सर्वात मोठ्या पोर्टफोलिओचा भाग असू शकतो. कारण तो बड्या कंपन्यात गुंतवणूकीची संधी देतो. तसेच मंदीच्या काळात त्यातील घसरणही कमी प्रमाणात राहण्यास मदत होऊ शकते आणि दीर्घ मुदतीसाठी चांगला परतावा मिळू शकतो.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
20.1 ° C
20.1 °
20.1 °
56 %
1.5kmh
0 %
Sun
23 °
Mon
27 °
Tue
28 °
Wed
27 °
Thu
26 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!