26.6 C
New Delhi
Tuesday, July 15, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानपुण्यात पीबी पार्टनर्सच्या वाढीस चालना

पुण्यात पीबी पार्टनर्सच्या वाढीस चालना

महाराष्ट्रातील १४५०० हून अधिक एजंट्स सह महिलांच्या सहभागात वाढ

पुणे : पॉलिसीबझार इन्शुरन्स ब्रोकर्स अंतर्गत येणारा ब्रॅन्ड पीबीपार्टनर्स या ब्रॅन्ड ने नेहमीच ग्राहकांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन काम केले आहे. नेहमीच टिअर २ आणि टिअर ३ शहरांमध्ये विम्या विषयीची जागरुगता फारच कमी प्रमाणात होती. महाराष्ट्रात पीओएसपी (पॉईंट ऑफ सेल्स पर्सन) एजंट पार्टनर्स ने नेहमीच रहिवाश्यांमध्ये विम्या विषयी जागरुकता निर्माण करण्यात मोठे योगदान दिले आहे. राज्यातील अधिकाधिक लोक हे वित्तीय सुरक्षेला प्राधान्य देत असतांनाच हे एजंट पार्टनर्स सुध्दा प्रत्येक पावलावर मदत करत त्यांना संपूर्ण विमा प्रवासात वैयक्तिक सल्ला आणि सहकार्य उपलब्ध करुन देत आहेत.

या शहरां बरोबरच अन्य शहरांमधूनही कंपनीच्या वाढीच्या योजनांच्या प्रसारात योगदान दिले आहे. मुंबई सह ठाणे, पुणे (pune), नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, कोल्हापूर आणि पालघर ही शहरे महत्त्वाची केंद्रे बनली आहेत.या शहरां बरोबरच अन्य शहरांमधूनही कंपनीच्या वाढीच्या योजनांच्या प्रसारात योगदान दिले आहे.

पीबीपार्टनर्स ने एकट्या मुंबईतच २५०० एजंट पार्टनर्सची नियुक्ती केली आहे. तर ठाण्यात १५७६ एजंट पार्टनर्स, पुण्यात १८३८ एजंट पार्टनर्स असून यामुळे राज्यातील संपूर्ण नेटवर्क हे विशाल बनून राज्यात एकूण १४,५४४ एजंट पार्टनर्स चा समावेश आहे. ही मोठी वाढ विशेषकरुन पीओएसपी (पॉईंट ऑफ सेल्स पर्सन) या नाविन्यपूर्ण मॉडेलचा वापर केल्यानंतर झाली असून यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करुन एजंट पार्टनर्स हे वित्तीय उत्पादने ही शहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना उपलब्ध करुन देत आहेत.

पीबीपार्टनर्सच्या महाराष्ट्रातील वाढीमध्ये इन्शुरन्स एजंट पार्टनर्स म्हणून महिलांचे मोठे योगदान आहे. पीबीपार्टनर्स चे सह-संस्थापक श्री. ध्रुव सरीन यांनी सांगितले “ महाराष्ट्रातील विमा क्षेत्रात महिलांनी मोठी आघाडी घेतली असून पीबीपार्टनर्स च्या वाढीच्या योजने मध्ये ३७५१ महिला एजंट पार्टनर्स चे योगदान आहे. या महिला पार्टनर्स या केवळ कर्मचा-यांनाच मदत करत नाहीत तर त्यांनी प्रसार करुन अनेक परिवारांना योग्य आर्थिक निर्णय घेण्यास सक्षम केले आहे. त्यांच्या योगदाना मुळेच पीबीपार्टनरचे वित्तीय सर्वसमावेशकता आणि समाजांना सक्षम करण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यात योगदान देणे शक्य झाले आहे.”

पीबीपार्टनर्स ने महाराष्ट्र आणि अन्य भागातील आपले अस्तित्व वाढवत असतांनाच कंपनी ने नेहमीच विश्वास निर्माण करण्या बरोबरच एजंटच्या क्षमता वाढवून, तंत्रज्ञानाचा वापर करुन विमा उत्पादने अधिक सहज उपलब्ध करण्यावर भर दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
26.6 ° C
26.6 °
26.6 °
75 %
4.8kmh
82 %
Mon
26 °
Tue
34 °
Wed
34 °
Thu
34 °
Fri
36 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!