पुणे – : फिजिक्सवाला (पीडब्ल्यू) या शिक्षण कंपनीने पेगासस कोर्स सुरू केला आहे. हा गतीशील अध्ययन प्रोग्राम जेईई अॅडवान्स्ड व नीट (NEET) परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी डिझाइन करण्यात आला आहे. आता विविध निवडक शहरांसह पुणे येथे उपलब्ध असलेला हा संरचित ऑफलाइन प्रोग्राम विविध वैशिष्ट्यांसह ऑलिम्पियाड प्रशिक्षण आणि समर्पित सराव व चाचणी टप्प्याच्या माध्यमातून लवकर तयारी करण्याची सुविधा देण्याचा प्रयत्न करतो.
पेगासस कोर्स विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये मदत करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. विद्यमान अभ्यासक्रमाचे शिक्षण देण्यासोबत पुढील इयत्तेच्या अभ्यासक्रमाचा मोठा भाग समाविष्ट करत हा प्रोग्राम शैक्षणिक पाया घडवण्याचा प्रयत्न करतो. लहान बॅच आकारांचा वैयक्तिकृत अवधान देण्याचा मनसुबा आहे, जेथे शिक्षकांची टीम विद्यार्थ्यांना संरचित अध्ययन दृष्टिकोनाच्या माध्यमातून मार्गदर्शन करते. या कोर्समध्ये शैक्षणिक प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी द्विसाप्ताहिक मूल्यांकन व ऑल इंडिया टेस्ट सिरीज (एआयटीएस) यांचा देखील समावेश आहे, तसेच या कोर्सचा संकल्पना दृढ करण्याचा आणि परीक्षा देण्याच्या धोरणांना अधिक सुधारित करण्याचा मनसुबा आहे. याव्यतिरिक्त, पेगाससमध्ये एनएसईजेएस आणि आयओक्यूएम यांसारख्या परीक्षांसाठी विशेषीकृत ऑलिम्पियाड वर्कशॉप्सचा समावेश आहे, ज्यांचा विद्यार्थ्यांची समस्या निवारण कौशल्ये अधिक निपुण करण्याचा उद्देश आहे.
पेगासस कोर्सची निर्णायक वैशिष्ट्ये म्हणजे त्यांची आठ महिन्यांची प्रखर उजळणी योजना, जी जेईई अॅडवान्स्ड आणि नीटसाठी तयारी करण्याकरिता विशेषरित्या डिझाइन करण्यात आली आहे. मार्गदर्शन, रिअल-टाइम शंका निरसन आणि परीक्षा-संबंधित धोरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयारी करण्याचा सर्वांगीण अनुभव मिळतो.
फिजिक्सवाला (पीडब्ल्यू)च्या ऑफलाइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित गुप्ता या प्रोग्रामबाबत आपला दृष्टिकोन सांगत म्हणाले, ”पीडब्ल्यूमध्ये आमचा विश्वास आहे की संरचित अध्ययन व लवकर तयारी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. पेगासससह आम्ही मार्गदर्शन, सराव आणि अवधान केंद्रित शैक्षणिक वातावरणाच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न करतो. आमचा दर्जेदार शिक्षण अधिक सहजसाध्य करण्याचा आणि विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने त्यांची स्वप्ने साकारण्यास सुसज्ज करण्याचा मनसुबा आहे.”
किफायतशीर व प्रभावी ऑफलाइन शिक्षणावर लक्ष केंद्रित करत पीडब्ल्यू अनुभवी शिक्षकवर्ग, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि रिअल-टाइम विद्यार्थी सपोर्टला एकत्र करत अध्ययनामधील तफावत दूर करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे सर्वांगीण अध्ययन अनुभवाची निर्मिती होईल.