10.1 C
New Delhi
Tuesday, January 14, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानभारताची नाविन्यपूर्ण फेशियल पेमेंट सुविधा स्माईलपे™चा शुभारंभ 

भारताची नाविन्यपूर्ण फेशियल पेमेंट सुविधा स्माईलपे™चा शुभारंभ 

भारताची नाविन्यपूर्ण फेशियल पेमेंट सुविधा वापरणारी ठरली देशातील पहिली बँक

पुणे : भारतातील खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या फेडरल बँकेने आपल्या ग्राहकांसाठी आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याकरिता स्माईल पे (SmilePay) या नवीन तांत्रिक सुविधेचा शुभारंभ करत असल्याची महत्वपूर्ण घोषणा केली आहे. या अभूतपूर्व तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना केवळ आपला चेहरा स्कॅन करुन आर्थिक  व्यवहार पूर्ण करता येणार आहे. भारत स्वातंत्र्याचे 78 वे वर्ष साजरे करत असताना बँकेतर्फे सुरू करण्यात आलेली ही आगळीवेगळी सुविधा, आर्थिक स्वातंत्र्य आणि सुविधांच्या दिशेने सुरू असलेल्या देशाच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. स्माईल पेचे अनावरण ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये फेडरल बँकेच्या कार्यकारी संचालक श्रीमती शालिनी वॉरियर यांच्या हस्ते करण्यात आले.

स्माईल पे™ चा शुभारंभ: चेहरा प्रमाणीकरणाआधारे (फेशियल ऑथेंटिकेशन) आर्थिक व्यवहारांच्या नवीन युगाची नांदी

रिलायन्स रिटेल आणि अनन्या बिर्ला यांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र मायक्रो हाऊसिंग (SMHFC) हे भारतातील दोन सर्वात बडे कॉर्पोरेट समूह आपल्यानिवडक आउटलेट्स/शाखांमध्ये ग्राहकांसाठी या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा प्रायोगिक तत्त्वावर अवलंब करणाऱ्यांपैकी पहिले समूह ठरले आहेत.

फेशियल ऑथेंटिकेशनच्या अतिप्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत UIDAI च्या भीम आधार पे प्रणालीच्या सहाय्याने तयार करण्यात आलेला स्माईलपे हा भारतातील अशा प्रकारचा पहिला पेमेंट पर्याय आहे. पारंपारिक निधी हस्तांतरणात आवश्यक असलेल्या इतर घटकांची गरज या क्रांतिकारी पर्यायामुळे सपुष्टात आली असून हा नवीन पर्याय ग्राहकांसाठी अतुलनीय सुविधा प्रदान करतो. तसेच व्यापाऱ्यांची कार्यक्षमता सुध्दा उंचावतो. 

स्माईलपे हे केवळ एक उत्पादन, पर्याय नसून ते एकमेकांशी अधिकाधिक बंधांनी जोडल्या गेलेल्या आणि कार्यक्षम अशा आर्थिक परिसंस्थेच्या दिशेने पडलेले एक महत्वाचे पाऊल आहे,” अशा शब्दांत फेडरल बँकेच्या कार्यकारी संचालक श्रीमती शालिनी वॉरियर यांनी या नवीन सुविधेचे कौतुक केले. “हे तंत्रज्ञान आमच्या ग्राहकांसाठी बँकिंग अनुभवात कोणते बदले घडवून आणतील, याबाबत आम्ही खुपच उत्सुक आहोत.” अशीही टिप्पणी त्यांनी केली.

फेडरल बँकेचे सीडीओ इंद्रनील पंडित म्हणाले, “कॅशपासून कार्ड्सकडे, क्यूआर कोडकडे वेअरेबलकडे आणि आता पैसे हस्तांतरीत करण्यासाठी फक्त एक स्मितहास्य देणे, या संक्रमणांकडे वाटचाल करण्याची संकल्पना हा ग्राहकांसाठी खरोखर एक रोमांचककारी अनुभव राहणार आहे.”

रिलायन्स रिटेलच्या निवडक आऊटलेट्सवर या नवीन पेमेंट पध्दतीच्या शुभारंभप्रसंगी  बोलताना रिलायन्स रिटेलचे संचालक व्ही. सुब्रमण्यम म्हणाले, “ग्राहकांना अनुभवसमृध्द करणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक अवलंब करण्याबाबत आम्ही रिलायन्स रिटेलमध्ये वचनबद्ध आहोत. स्माईलपे™ हा तांत्रिक आविष्कार आमच्या दृष्टीकोनाशी पूर्णपणे मिळताजुळता आहे. ग्राहकांचा प्रवास अधिक अंतर्ज्ञानी आणि सोयीस्कर बनवून त्यांना  अखंड, सुरक्षित आणि नाविन्यपूर्ण पर्याय स्माईलपे ही सुविधा प्रदान करते.”

SMHFC चे संचालक विनीत चत्री म्हणाले, “सुश्री अनन्या बिर्ला यांच्या भविष्यकालीन दृष्टीकोनाशी संरेखित राहत स्वतंत्र मायक्रो हाऊसिंग (SMHFC) गृहरुपी मालमत्तेचे संपादन सुलभ करताना दोन पिढ्यांमध्ये गुंतवणूकीचा बंध जोडण्यास मदत करते. ग्राहक-केंद्रित धोरणांवर लक्ष केंद्रित करताना, SMHFC आपल्या ग्राहकांसाठी परवडणारे, सोयीस्कर, सुरक्षित आणि चिरकालीन समाधान प्रदान करण्यासाठी समर्पित आहे. आम्हाला फेडरल बँकेसोबत भागीदारी करताना अतिशय आनंद होत आहे. तसेच आम्हाला विश्वास आहे की,  स्माईलपेव्दारे प्रदान करण्यात आलेले पर्याय या दिशेने टाकलेले खरोखरच एक नाविन्यपूर्ण पाऊल होय.”

स्माईलपे™ ची प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे:

•                     अतुलनीय सुविधा: रोख रक्कम, कार्ड किंवा मोबाईल उपकरणे स्वतः जवळ नसतानाही ग्राहक व्यवहार पूर्ण करू शकतात.

•                     व्यापाऱ्यांची वाढलेली कार्यक्षमता: गर्दीचे प्रभावीपणे व्यवस्थापन करता येते आणि काउंटरवर अखंड व्यवहार प्रक्रिया आणखी सुलभ होते.

•                     मजबूत सुरक्षा: सुरक्षित UIDAI फेस ऑथेंटिकेशन सेवेचे पाठबळ असल्याने सुरक्षित आणि विश्वासार्ह व्यवहाराची खात्री प्रदान होते.  

•                     वापरणाऱ्यांसाठी सहजसोपे: एक साधा, अंतर्ज्ञानी इंटरफेस ज्यामध्ये खरेदीचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी फक्त चेहऱ्याचा स्कॅन आवश्यक ठरतो.

•                      

उपलब्धता आणि भविष्यातील विस्तार

स्माईलपे™ सुविधा सुरुवातीला फक्त फेडरल बँक ग्राहकांसाठी उपलब्ध असेल.  व्यापारी आणि ग्राहक दोघांचीही बँकेत खाती असणे आवश्यक आहे. फेडरल बँकेने नजीकच्या भविष्यात या सेवेचा विस्तार करण्याबरोबरच धोरणात्मक भागीदारी करण्याच्या योजनासुध्दा आखलेल्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
fog
10.1 ° C
10.1 °
10.1 °
100 %
2.6kmh
100 %
Tue
22 °
Wed
22 °
Thu
19 °
Fri
22 °
Sat
20 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!