34.8 C
New Delhi
Sunday, July 13, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानमनप्पुरम फायनान्सने गणेश चतुर्थीसाठी आणले  ‘गणेशाचे सोनेरी स्मित हास्य'

मनप्पुरम फायनान्सने गणेश चतुर्थीसाठी आणले  ‘गणेशाचे सोनेरी स्मित हास्य’

पुणे : देशातील प्रमुख सोन्याचे कर्ज देणाऱ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या मनप्पुरम फायनान्स लिमिटेडने ‘गणेशाचे सोनेरी स्मित हास्य ‘ नावाचा एक नवीन प्रचारात्मक लघुपट प्रदर्शित केला आहे. हा लघुपट ‘गणेश चतुर्थी’ या संकल्पनेवर आधारित आहे, जो भगवान गणेशाच्या जन्माचा उत्सव साजरा करतो, जो आपल्या भक्तांच्या मार्गातील अडथळे दूर करणारा मानला जातो. या लघुपटामध्ये मनप्पुरम फायनान्सच्या इन्स्टंट गोल्ड लोन अॅपचे प्रमोशन केले आहे, ज्यामुळे लोक कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणाहून सोन्याचे कर्ज घेऊ शकतात.

लघुपटाची सुरुवात एका मुलाच्या दृश्याने होते, जो एक संगीत मिरवणूक पाहत असतो. मुलाला मिरवणुकीत सामील होण्याची इच्छा असते, परंतु त्याच्याकडे आवश्यक संगीत वाद्य नसल्यामुळे तो सामील होऊ शकत नाही. अचानक, गणपतीच्या रूपात एक व्यक्ती त्या मुलासमोर येतो आणि त्या मुलाची इच्छा ऐकल्यानंतर, मनप्पुरम ऑनलाइन गोल्ड लोन अॅपच्या मदतीने वाद्य खरेदी करण्यासाठी आवश्यक रक्कमेची व्यवस्था करतो आणि नंतर गर्दीतून अदृश्य होतो.

हा लघुपट चार भाषांमध्ये तयार करण्यात आला आहे: हिंदी, मराठी, कन्नड आणि तेलुगू. “हा लघुपट मनप्पुरम फायनान्सच्या मोबाइल अॅपला प्रमोट करतो, जो लोकांना सर्वात कमी वेळेत सोन्याचे कर्ज मिळविण्यात मदत करतो,” असे मनप्पुरम फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वी. पी. नंदकुमार यांनी सांगितले. “आम्ही आमच्या ग्राहकांसाठी गोष्टी जलद आणि सोयीस्कर बनविणाऱ्या नव्या युगातील उपाय देण्यासाठी नेहमी तत्पर असतो ,” असेही त्यांनी नमूद केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
34.8 ° C
34.8 °
34.8 °
47 %
3.1kmh
85 %
Sun
35 °
Mon
39 °
Tue
35 °
Wed
37 °
Thu
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!