पुणे, : महावितरणच्या पुणे परिमंडल अंतर्गत पंचवटी उपकेंद्राने नुकतेच ‘आयएसओ ९००१:२०१५’चे मानांकन मिळविले आहे. मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार व ‘आयएसओ’चे परीक्षक श्री. नंदकुमार देशमुख यांच्याहस्ते या उपकेंद्राला मानांकनाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. आतापर्यंत पुणे परिमंडलातील सहा उपकेंद्रांनी ‘आयएसओ’चे प्रमाणपत्र मिळविले आहे.
पंचवटी उपकेंद्रामध्ये आयोजित कार्यक्रमाला अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले (रास्तापेठ), संजीव नेहते (स्थापत्य), अमित कुलकर्णी (इन्फ्रा), कार्यकारी अभियंता श्री. रवींद्र आव्हाड (पद्मावती), विजेंद्र मुळे (स्थापत्य) तसेच तुकाराम डिंबळे, बाबा शिंदे आदींची उपस्थिती होती. पंचवटी उपकेंद्राला ‘आयएसओ’चे मानांकन मिळवून देण्यासाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता डॉ. संजय घोडके, सहायक अभियंता सौ. पल्लवी पेटकर यांच्यासह अरुण महाले, बाबासाहेब सूर्यवंशी, संतोष भिसे, पंकज सिरसाठ, सुरेश घागरे, गणपत मालघरे, मोहन गावडे, संजय हवाले, धनंजय पवार, महेश लहाने, भिमा कांबळे यांनी परिश्रम घेतले.
वीजग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठ्याची सेवा देण्यासाठी उपकेंद्रांची योग्य निगा, दर्जा व गुणवत्ता अबाधित ठेवण्याचे निर्देश मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी दिले आहेत. त्यादृष्टीने तसेच आयएसओ ९००१:२०१५ मानांकनाच्या निकषांनुसार उपकेंद्रांची गुणवत्ता, कामकाजाचा दर्जा, सर्व प्रकारची सुरक्षा उपाययोजना व उपकरणांची उपलब्धता, पर्यावरण दस्ताऐवजीकरण, वैद्यकीय सुविधा, सुशोभीकरण आदी कामे करण्यात येत आहे.