पुणे, – देशातील शिक्षण क्षेत्रात माइल स्टोन ठरलेली माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचा ४२वा स्थापना दिवस सोमवार, ५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.४५ वा. कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयू मधील संत ज्ञानेश्वर सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदयजी सामंत हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील.
माईर्स एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा.प्रकाश जोशी व एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड यांची उपस्थिती असेल.
स्थापना दिनाचे औचित्य साधून ११ कर्मचार्यांचा व संस्थेत १४ वर्षे अविरत सेवा देणारे ३ कर्मचार्यांना विशेष पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.
या संस्थेने संत ज्ञानेश्वर माऊली व जगदगुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या नावाने अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा या नावाखाली जगातील सर्वात मोठ्या विश्वशांती घुमटाची उभारणी केली आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्राच्या इतिहासात अभिनव अशी मानवी देह आणि बुद्धी व आत्मा आणि मन यांचा समन्वय साधणारी मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण पद्धतीची संपूर्ण जगाला विश्वशांती व मानवीकल्याणाचा मार्ग दाखविणारी एक अद्भूत व नाविन्यपूर्ण अशी देणगी या संस्थेने दिली आहे.
माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचा ४२वा स्थापना दिवस
महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदयजी सामंत यांची उपस्थिती
RELATED ARTICLES
New Delhi
haze
21.1
°
C
21.1
°
21.1
°
64 %
1kmh
0 %
Sat
25
°
Sun
34
°
Mon
37
°
Tue
39
°
Wed
39
°