22.1 C
New Delhi
Thursday, February 6, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानविंग्स अनव्हील्ड : अ हँडबुक ऑफ बर्ड फोटोग्राफी‌’ पुस्तकाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

विंग्स अनव्हील्ड : अ हँडबुक ऑफ बर्ड फोटोग्राफी‌’ पुस्तकाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर


पुणे : देश विदेशातील तज्ज्ञ मंडळी, पक्षी छायाचित्रकार, पक्षी निरीक्षक तसेच विविध माध्यमांनी गौरविलेल्या ‌‘विंग्स अनव्हील्ड : अ हँडबुक ऑफ बर्ड फोटोग्राफी‌’ पुस्तकाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‌‘ इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड 2024‌’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. अभ्यासक, हौशी छायाचित्रकार निर्मित या पुस्तकाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर झाल्यामुळे पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
पुण्यातील डॉ. सुधीर हसमनीस, डॉ. पूनम शहा, नेहा फडके, गायत्री हसबनीस-पिंपळे, पल्लवी शिवलकर आणि आनंद विकामशी यांनी एकत्र येऊन या पुस्तकाची निर्मिती केली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन जगविख्यात पक्षी छायाचित्रकार जैनी मारिया व प्राईम्स ॲन्ड झूम्सचे संस्थापक, सीईओ अभिजित मुथा यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच पुण्यात करण्यात आले आहे.
शैक्षणिक क्षेत्रात उत्तम योगदान दिल्याबद्दल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार इंटरनॅशनल पब्लिशर्स असोसिएशन, जिनिव्हा आणि द फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स यांच्या सहकार्याने दिला जातो. एक्सेलर बुक या जागतिक पातळीवरील पुस्तक प्रकाशन संस्थेतर्फे या पुरस्कारासाठीची प्रक्रिया राबवली जाते. स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि वीस हजार रुपयांचे गिफ्ट कुपन असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरण समारंभ ऑक्टोबरमध्ये होणार आहे.
पक्षी छायाचित्रणाकरिता आवश्यक मुलभूत गोष्टी, शेकडो प्रतिमा आणि आकृत्यांनी भरलेल्या या पुस्तकात पक्षी छायाचित्रणातून मिळणारा आनंद, योग्य कॅमेरा गिअर्स, ट्रायपॉडस्‌‍, कॅमेरा बॅग, ॲक्सेसरीजची निवड, कॅमेरा सेटिंग्ज आणि तंत्रे, फ्रेमिंग आणि रचना, प्रकाशाचा सुयोग्य वापर, प्रक्रिया, पक्षांच्या छायाचित्रणाविषयी व्यावहारिक माहिती, पर्यावरण आणि संवर्धन, पक्ष्यांची ठिकाणे, छायाचित्रणाप्रसंगी पाळायची आचारसंहित आणि प्रतिज्ञा, कॅमेरा आणि लेन्स कॉम्बोज या विषयी उत्तम माहिती दिलेली आहे.
आर्ट पेपरवर छापलेल्या या पुस्तकाची सजावट आणि मांडणी चंद्रमोहन कुलकर्णी, राजेश भावसार यांनी केली आहे.

‌‘विंग्स अनव्हील्ड : अ हँडबुक ऑफ बर्ड फोटोग्राफी‌’ हे पुस्तक उत्साही पक्षीनिरिक्षक, नवशिके छायाचित्रकार तसेच प्रगत छायाचित्रकारांना अत्यंत उपयुक्त ठरेल. या पुस्तकाद्वारे सर्व लेखकांनी पक्षी छायाचित्रण क्षेत्रात आलेले आपले अनेक दशकांचे अनुभव अतिशय सोप्या शब्दांत वाचकांसमोर मांडले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
22.1 ° C
22.1 °
22.1 °
24 %
4.6kmh
0 %
Thu
22 °
Fri
24 °
Sat
26 °
Sun
28 °
Mon
29 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!