21.1 C
New Delhi
Sunday, March 23, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानविद्यार्थ्‍यांच्‍या यशस्‍वी करिअरला अधिक प्रबळ

विद्यार्थ्‍यांच्‍या यशस्‍वी करिअरला अधिक प्रबळ

पीडब्‍ल्‍यूएनएसएटीने २.२ कोटी रूपयांहून रोख पारितोषिक

पीडब्‍ल्‍यूएनएसएटीने २.२ कोटी रूपयांहून रोख पारितोषिकांसह गुणवंत विद्यार्थ्‍यांना पुरस्कृत करत विद्यार्थ्‍यांच्‍या यशस्‍वी करिअरला अधिक प्रबळ केले.
फिजिक्‍सवाला (पीडब्‍ल्‍यू) या शैक्षणिक व्‍यासपीठाने नॅशनल स्‍कॉलरशिप अॅडमिशन टेस्‍ट (पीडब्‍ल्‍यूएनएसएटी) २०२४ मध्‍ये टॉप परफॉर्मर्स ठरलेल्‍या देशभरातील १,५८१ विद्यार्थ्‍यांचा सन्‍मान केला. पुण्‍यामध्‍ये पीडब्‍ल्‍यूने ३५ विद्यार्थ्‍यांचा सन्‍मान केला. दर्जेदार शिक्षण सहजपणे उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या प्रयत्‍नाचा भाग म्‍हणून पीडब्‍ल्‍यूने सत्‍कार समारोहामध्‍ये या विद्यार्थ्‍यांना एकूण २.२ कोटी रूपये रोख पारितोषिकांसह पुरस्‍कारित केले, जेथे त्यांच्‍या शैक्षणिक यशाचा सन्‍मान करण्‍यात आला. या समारोहासह पीडब्‍ल्‍यूएनएसएटी २०२४ ची सांगता झाली. १५.५ लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले होते, ज्‍यामुळे हा देशातील मोठा स्‍कॉलरशिप उपक्रम ठरला.

२५० कोटी रूपये निधी असलेली पीडब्‍ल्‍यूएनएसएटी २०२४ स्‍कॉलरशिप पीडब्‍ल्‍यूच्‍या दृष्टिकोनाला सादर करते, जेथे विद्यार्थ्‍यांना ट्यूशन फीचा भार न सहन करता दर्जेदार शिक्षण उपलब्‍ध करून देण्‍यास मदत करते. पीडब्‍ल्‍यूएनएसएटी २०२४ च्‍या माध्‍यमातून जेईई व नीट (NEET) या परीक्षांच्‍या उमेदवारांना फॅकल्‍टी, संसाधने व शैक्षणिक वातावरण उपलब्‍ध करून देण्‍याचा मनसुबा आहे. स्‍कॉलरशिप उपक्रम आर्थिक साह्य देण्‍यासोबत निवास सुविधा व मार्गदर्शन देतो, ज्‍यामुळे गुणवंत विद्यार्थ्‍यांना त्‍यांची शैक्षणिक ध्‍येये गाठण्‍यास मदत होते. यंदा, ५ लाखांहून अधिक विद्यार्थ्‍यांना किमान ५० टक्‍के स्‍कॉलरशिप मिळाली.

पीडब्‍ल्‍यूचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी अलख पांडे म्‍हणाले, “आम्‍ही सुरूवात केली तेव्‍हा शिक्षण सहजसाध्य व किफायतशीर करण्‍याचा सोपा संकल्‍प होता. पीडब्‍ल्‍यूएनएसएटी २०२४ आम्‍ही केलेल्‍या प्रयत्‍नांपैकी एक आहे, जेथे प्रतिभावान विद्यार्थ्‍यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. ही २५० कोटी रूपयांची स्‍कॉलरशिप फक्‍त आकडेवारी नाही तर त्‍यामधून विद्यार्थ्‍यांच्‍या भविष्‍याला आकार देण्‍यामध्‍ये मदत करण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. आज आम्‍ही सन्‍मान करत असलेल्‍या १,५८१ विद्यार्थ्‍यांनी अथक मेहनत घेतली आहे आणि त्‍यांच्‍या प्रयत्‍नांना सन्‍मानित करण्‍याची ही आमची पद्धत आहे. ते त्‍यांची स्‍वप्‍ने साकारतील आणि इतरांना तसे करण्‍यास मदत करतील तेव्‍हाच खरे यश मिळेल.”

सत्‍कार समारोहामध्‍ये या विद्यार्थ्‍यांची चिकाटी, समर्पितता आणि यशाला प्रशंसित करण्‍यात आले. या समारोहामध्‍ये अपवादात्‍मक टॅलेंटचा सन्‍मान व पुरस्‍कार करण्‍यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षण आणि शैक्षणिक प्रमुख एकत्र आले. या उपक्रमासह पीडब्‍ल्‍यूने भारतातील शिक्षणाचा दर्जा उंचावत ठेवला आहे आणि शिक्षण समान, किफायतशीर व सक्षम करण्‍याचा आपला मनसुबा दृढ केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
21.1 ° C
21.1 °
21.1 °
64 %
1kmh
0 %
Sat
25 °
Sun
34 °
Mon
37 °
Tue
39 °
Wed
39 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!