20.1 C
New Delhi
Wednesday, October 15, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानसावधान वाहन धारकांनो

सावधान वाहन धारकांनो

100 आणि 50 वेळा नियम मोडल्यास होणार परवाना रद्द

पुणे -पुणे शहरात १०० अन् ५० वेळा वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांची यादी तयार केली जात आहे. त्यात १०० हून अधिक वेळा नियमभंग करणाऱ्या २१ वाहनधारक सापडले आहेत. तसेच ५० हून अधिक वेळा नियमभंग करणाऱ्या ९८८ वाहनांची यादी मिळाली आहे. आता अशा वाहनचालकांचा परवाना रद्द केला जाणार आहे. पुणे पोलिसांच्या pune police या कडक कारवाईमुळे वाहन धारकांना रस्त्यावर वाहन चालवणेच अवघड होणार आहे.जर एखाद्या व्यावसायिक वाहन धारकाकडून नियम मोडला जात असेल तर त्याचा व्यावसायिक परवाना रद्द केला जाणार आहे. सातत्याने नियम मांडणाऱ्यांना आता कारवाईपासून सुटका होणार नाही. पोलीस आयुक्त अमीतेश कुमार यांनी याबाबत माहिती दिली.

शहरात नाही तर देशातील अनेक शहरांमध्ये काही वाहनधारक travel सातत्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असतात. त्या वाहन धारकांकडून नेहमी वाहतूक नियमांची पायमल्ली होत असते. मग कधी ओळख दाखवून, कधी चिरमिरी तर कधी दंड fine भरुन ही लोक सुटत असतात. परंतु त्यानंतर पुन्हा वाहतूक नियमांचे पालन करत नाही. त्यामुळे पुणे पोलिसांनी आता कठोर भूमिका घेतली आहे. त्यासाठी एक नवीनच फंडा राबवण्यास सुरुवात केली आहे. सातत्याने वाहतूक नियम मोडणाऱ्यांची यादी पुणे पोलीस तयार करत आहेत. यामुळे आता सतत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, पुण्याचे पोलीस आयुक्त अमीतेश कुमार यांनी याबाबत माहिती दिली.

पुणे शहरात राज्यात नाही तर देशात सर्वाधिक वाहनधारक आहेत. त्यामुळे पुणे शहरात वाहतुकीचा प्रश्न मोठा आहे. अनेक मुख्य रस्त्यांवर वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार सातत्याने होत असतात. तसेच वाहनधारकांच्या चुकांमुळे छोटेमोठे अपघात होत असतात. आता पुणे शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. त्यामुळे वारंवार नियम मोडणाऱ्या वाहनधारकांचे वाहन परवानाच निलंबित होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
20.1 ° C
20.1 °
20.1 °
83 %
0kmh
0 %
Wed
33 °
Thu
33 °
Fri
33 °
Sat
33 °
Sun
32 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!