13.1 C
New Delhi
Tuesday, January 21, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानहिंगोली जिल्ह्यात बनत आहे देशातील पहिले हळद संशोधन केंद्र

हिंगोली जिल्ह्यात बनत आहे देशातील पहिले हळद संशोधन केंद्र

कोरोनानंतर हळदीला जगभरात मोठे महत्व आले आहे. पाश्चिमात्य राज्यात रोग प्रतिकार शक्ती वाढविणारा (इम्युनिटी बुस्टर) घटक म्हणून हळदीच्या गोळ्या विकल्या जात आहेत. स्टारबक्स सारख्या आंतरराष्ट्रीय चैन असलेल्या कॅफेमध्ये ‘गोल्डन टर्मरिक ल्याटे’ या नावाने हळदीचे दूध महागड्या दराने विकले जात आहे. युरोपात अल्झायमर व पार्किन्सन आदी आजारांच्या औषधामध्ये हळदीपासून निर्माण होण्याऱ्या तेलाचा वापर करण्यात येत आहे.

हळदीचा वापर दैनंदिन जीवनापासून ते औषध निर्मितीसाठी केला जातो. त्यामुळे हळदीला देश आणि जगभरातून मोठी मागणी आहे. या पिकास किड कमी प्रमाणात लागते पाण्याचा वापर कमी प्रमाणात होते. देशभरात ५० लाख टन हळदीचा वापर होतो त्यापैकी निम्मी हळद महाराष्ट्रात उत्पादित होते.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे देशातील पहिले हळद संशोधन केंद्र होत आहे. देश आणि जागतिक पातळीवरून हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहीत करून त्याचे क्लस्टर करणार आहे. या केंद्रासाठी 800 कोटी रुपयांचा निधी आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.

देशातले पहिले हळद संशोधन केंद्र ‘वसमत’ येथे, मुख्यमंत्र्यांनी केला 800 कोटींचा निधी मंजूर

हळद उत्पादनातून मराठवाडा, विदर्भात सुवर्णक्रांती होईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हळद शेतकऱ्यांना खुशखबर देशातील पहिले हळद संशोधन केंद्र होणार महाराष्ट्रात

हिंगोलीची हळद पोहोचणार जगाच्या नकाशावर

राज्यातील या जिल्ह्यात हळदीचे क्षेत्र

राज्यात हिंगोली, नांदेड, सातारा, जालना, परभणी, जळगाव, तर विदर्भातील वाशिम, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, नागपूर जिल्ह्यांत हळदीचे मोठे क्षेत्र आहे. विदर्भातील उर्वरित जिल्हेही हळद उत्पादनाकडे वळत आहेत.

हिंगोलीच का?

राज्यातील हळद क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे. २०२१-२२ मध्ये राज्यात ८४ हजार ६६ हेक्टर क्षेत्रावर हळदीचे उत्पन्न घेण्यात आले. महाराष्ट्रातील हळद उत्पादनाचा विचार करता राज्यातील एकूण उत्पादनाच्या 60 टक्क्याहून जास्त वाटा एकट्या हिंगोली जिल्ह्याचा आहे. या एकमेव जिल्ह्यात हळदीचे क्षेत्र १ लाख हेक्टरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.हिंगोली जगात सर्वाधिक हळद पिकविणारा जिल्हा महणून जागतिक नकाशावर झळकत आहे.

हिंगोली परिसरात वायगाव प्रतिभा सेलम या जातीच्या हळदीची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. राज्यात मागील वर्षी हळद लागवडीचे एकूण क्षेत्र सुमारे 84 हजार 66 हेक्टर आहे. त्यापैकी एकट्या हिंगोलीत 49 हजार 764 हेक्टर क्षेत्रावर हळद लागवड केली आहे. हे क्षेत्र एकूण क्षेत्राच्या तुलनेत निम्म्याहून अधिक आहे. याशिवाय जवळच्या नांदेड जिल्ह्यात 13 हजार 131 हेक्टर, वाशिम जिल्ह्यात 4 हजार 149 हेक्टर असे हळदीचे क्षेत्र आहे. मराठवाडा आणि विदर्भात हळदीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे उत्तर भारतातील व्यापारी सांगली ऐवजी मराठवाड्यातील हळदीला पसंती देत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात मंजूर झालेल्या हळद प्रक्रिया उद्योगाने उच्चशिक्षित बेरोजगार युवकांसाठी हा प्रकल्प वरदान ठरणार आहे.

वसमत संशोधन केंद्रा

जिल्ह्यात हळदीमध्ये अडचणीची बाब म्हणजे हिंगोलीसह मराठवाड्यातील हळदीत कुरक्युमीनची मात्रा कमी आहे. इथल्या हळदीचा रंग आणि चव उत्तम असल्यामुळे या हळदीला घरगुती वापरासाठी मोठी मागणी आहे.

बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून केंद्रामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे पिकांचे आयुष्यमान वाढविण्यासाठी रेडिएशन सेंटर, कूल स्टोअरेजची व्यवस्था होणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी भाभा परमाणू अनुसंधान केंद्राच्या अग्री बायोटेक विभागामार्फत प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे.

हळदीचे संकरीत बियाणे, खत आणि पाण्याचे योग्य नियोजन व हळदीसाठी लागणारे कृषी अवजारे, यांत्रिकिकरण, बॉयलर व पोलिशर साहित्यासाठी शेतकऱ्यांना सबसिडी, कुरकुमीन तपासणी केंद्र, हळद निर्यात केंद्र, व्यवस्थापन, माती-पाणी तपासणी केंद्र आदी सुविधा केंद्राच्या माध्यमातून मिळणार आहे.

एवढेच नाही तर टिश्यू कल्चर प्रयोगशाळा उभारुन त्यावरही काम केले जाणार आहे. एक जिल्हा एक पीक या योजनेत हिंगोलीचा अगोदरच समावेश झाला आहे. तसेच हळद काढणी पश्चात ओले हळकुंड शिजवणे, त्यांना सूर्यप्रकाशात वाळविणे हे कौशल्याचे काम आहे.

हळकुंड तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रती एकर 10 हजार रुपयापर्यंत खर्च येतो. काढणी प्रक्रियेचा खर्च कमी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कच्ची हळद ते हळद पावडर करण्यासाठी केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था, म्हैसूर यांनी हळद काढणी पश्चात नवीन तंत्रज्ञान तयार केले आहे. तसेच पारंपारिक पध्दतीने शिजविण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात लाकडांचा प्रयोग होत असल्यामुळे प्रदूषण होत असल्याचा कधीकधी आरोप होतो. आधुनिक पध्दतीने ओल्या हळकुंडावर प्रक्रिया करुन शेतकऱ्यांची हळद शिजविणे, वाळविणे यासाठीचा खर्च कमी करण्यासाठी जिल्ह्यात वसमत येथे बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण प्रक्रिया केंद्र मंजूर करण्यात आले आहे. यासाठी निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. यामुळे हळदीला महत्व येणार आहे. शिवाय हळदीचे उत्पादन क्षेत्र आणखी वाढणार आहे. त्याचा लाभ देखील होणार असल्याने यातून रोजगार निर्मिती होणार आहे. यामुळे बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र हा प्रकल्प जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

संशोधन केंद्राचा नेमका फायदा काय?

संशोधन केंद्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो. त्यामुळे उत्पादित माल किमान दोन वर्षे टिकवून ठेवता येतो.

शेतकऱ्यांना हळद बियाणे, खते आणि पाणी, कृषी उपकरणे, कर्क्युमिन चाचणीसाठी आवश्यक यांत्रिकीकरण, बॉयलर आणि पॉलिशर उपकरणांचे योग्य नियोजन करणे, हळद निर्यात केंद्र, व्यवस्थापन, माती-पाणी परीक्षण केंद्र आदींसाठी अनुदान उपलब्ध असेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
13.1 ° C
13.1 °
13.1 °
94 %
2.1kmh
0 %
Tue
25 °
Wed
26 °
Thu
24 °
Fri
24 °
Sat
21 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!