पुणे, सिंबायोसिस स्किल्स आणि प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU) च्या लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट विभागाने नुकतीचब्रेम्बो ब्रेक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा औद्योगिक दौरा केला. ही कंपनी ऑटोमोटिव्ह ब्रेकिंग सिस्टिम्समध्ये जागतिक पातळीवर अग्रणी आहे. या भेटीने विद्यार्थ्यांना ब्रेम्बोच्या अत्याधुनिक उत्पादन सुविधांची माहिती घेता आली. कंपनी दौऱ्यामुळे ऑटोमोटिव्ह उद्योगातील एक उत्कृष्ट आणि जटिल सप्लाय चेन प्रक्रियेची सखोल माहिती घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळालेली.

ब्रेम्बो ब्रेक्स इंडिया, जी उच्च कार्यक्षमतेच्या ब्रेकिंग सिस्टिम्ससाठी ओळखली जाते, कंपनीमध्ये विद्यार्थ्यांना ही सिस्टीम जवळून पाहता आली. कच्च्या मालापासून ते अंतिम उत्पादन वितरणापर्यंत, उत्पादन, तंत्रज्ञान, लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट, ब्रेकिंग सिस्टिम्सची कार्यक्षमता आणि उत्कृष्टता कशी सुनिश्चित केली जाते हे पाहता आले. सप्लाय चेनमधील प्रभावी समन्वय साधण्यासाठी खरेदीपासून ते वितरणापर्यंत प्रत्येक टप्प्यावर कार्यान्वित केली जाणारी प्रणाली, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, सप्लाय चेन ऑप्टिमायझेशन आणि कार्यप्रणालीला सुव्यवस्थित करण्यासाठी तंत्रज्ञाना,अत्याधुनिक लॉजिस्टिक्स धोरणांबद्दल माहिती मिळाली.
उच्च कार्यक्षमतेच्या ब्रेक सिस्टिम्सची डिझाइन आणि उत्पादन प्रक्रिया, अशी ही उत्पादन प्रक्रिया जगभरातील काही प्रमुख ऑटोमोटिव्ह ब्रॅण्ड्ससाठी तयार केली जातात. ब्रेम्बोच्या मानव संसाधन विभागाच्या प्रमुख, गीताांजली शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उद्योग तज्ञांशी संवाद साधत आणि वर्गातील ज्ञान प्रत्यक्ष कार्यपद्धतीमध्ये कसे रुपांतरित होऊ शकते हे शिकण्यासाठी मिळालेली संधी अत्यंत उपयुक्त ठरली.