31.3 C
New Delhi
Tuesday, April 29, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानएचआयएल लिमिटेड आता बिर्लानु लिमिटेड

एचआयएल लिमिटेड आता बिर्लानु लिमिटेड

पुणे – अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या सीके बिरला ग्रुपचा भाग असलेले एचआयएल लिमिटेडने आता त्यांच्या कंपनीचे नाव बदलून “बिरलानू लिमिटेड’’ करण्याची घोषणा केली आहे. हे नवे नामकरण कंपनीच्या महत्त्वाकांक्षी वाढीच्या धोरणाचे प्रतीक आहे आणि जागतिक दर्जाचे उत्पादन आणि सेवा पुरवण्याच्या वचनबद्धतेचा एक भाग आहे. कंपनीचे भारत आणि युरोपमध्ये एकूण ३२ उत्पादन केंद्रे असून, ८० हून अधिक देशांमध्ये ग्राहक आणि भागीदार आहेत.

बिरलानूच्या अध्यक्षा अवंती बिरला म्हणाल्या, “बिरलानू ही आमची नवीन ओळख आम्ही कोण आहोत हे स्पष्ट करते – आम्ही सातत्याने प्रगती करणारी कंपनी आहोत. आम्ही गुणवत्ता, नाविन्य आणि टिकाऊ उत्पादनांवर विश्वास ठेवतो. आम्ही गृहसंकुल मालक, बांधकाम व्यावसायिक आणि डिझायनर्ससाठी कार्य करतो. उत्तम उत्पादने तयार करणे, शाश्वतता सुधारणे आणि बांधकाम क्षेत्रात नवकल्पना आणणे हे आमचे ध्येय आहे. आम्ही अशा नाविन्यपूर्ण इमारती आणि संरचना तयार करतो ज्या काळाच्या कसोटीवर टिकतात.”

बिरलानू चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षत सेठ म्हणाले, “आमचे लक्ष्य आधुनिक बांधकामाच्या गरजा पूर्ण करणारे उच्च-गुणवत्तापूर्ण, शाश्वत बांधकाम साहित्य पुरवणे आहे जसे की पाईप्स, बांधकाम रसायने, पुट्टी, छप्पर, भिंती आणि फ्लोअरिंग. आम्ही या उद्देशासाठी मोठे पाऊल उचलले आहे. आम्ही युपीव्हीसी पाईप उत्पादनात भारतातील पहिले ऑर्गेनिक बेस्ड स्टॅबिलायझर्स (ओबीएस) आणले आहेत, ज्यामुळे जड धातूंचे प्रमाण शून्य होते. यावर्षी पाटण्यात आम्ही ओपीव्हीसी पाईप्ससाठी ग्रीनफिल्ड उत्पादन केंद्र सुरू करणार आहोत. चेन्नईतील आमच्या एसीसी ब्लॉक्सच्या उत्पादन क्षमतेत दुप्पट वाढ करून ती ४ लाख क्युबिक मीटर प्रतिवर्ष केली आहे, ज्यामुळे हे देशातील एक मोठे उत्पादन केंद्र बनले आहे. तसेच, होम(घरे) आणि इंटेरिअर्स क्षेत्रात प्रवेश करताना, आम्ही आमचा जागतिक दर्जाचा फ्लोअरिंग ब्रँड – पराडोर भारतात आणण्याचा विचार करत आहोत.”

बिरलानू चे मुख्य व्यवसाय अधिकारी विजय लाहोटी म्हणाले, “बांधकाम साहित्य उत्पादनांच्या विस्तृत पोर्टफोलिओमुळे महाराष्ट्र हे बिरलानू साठी एक प्रमुख बाजारपेठ आहे. आमच्या उत्पादनांमध्ये पाणी व्यवस्थापन उपायांची प्रगत श्रेणी असलेले बिरलानू लीकप्रूफ पाईप्स हे खास वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन आहे. ट्रूफिट तंत्रज्ञानाने विकसित केलेले हे पाईप्स पाण्याची गळती पूर्णपणे रोखत जॉइंट्समध्ये(जोडणी) अधिक मजबुती देतात ज्यामुळे कार्यक्षमतेत नवीन मानक स्थापित होतात.” 

रिअल इस्टेट, बांधकाम आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असताना, बिरलानू जलद, मजबूत आणि अधिक शाश्वत बांधकाम उपाय प्रदान करण्यास वचनबद्ध आहे.  

संपूर्ण भारतभर आमच्या पाईप्स श्रेणीत ७०% पेक्षा जास्त वार्षिक वाढ झाल्याने आणि २०२४ मध्ये पाटण्यातील टॉपलाइन ब्रँडचे निर्माता क्रेस्टिया पॉलीटेकचे अधिग्रहण करून आम्ही आमचा विस्तार अधिक मजबूत केल्याने आम्हाला आमच्या योजनांवर ठाम विश्वास आहे.

प्रामाणिकता, सहकार्य आणि उत्कृष्टता यांना केंद्रस्थानी ठेवत बिरलानू उद्योगात नवीन मानदंड प्रस्थापित करण्यासाठी आणि अर्थपूर्ण प्रभाव पाडण्यासाठी सज्ज आहे. बिरलानू हे फक्त नाव नसून, ते भविष्यातील उभारणीसाठी एक नवसंजीवनी आणि वचनबद्धतेचे प्रतीक आहे. बदलत्या जगासोबत आम्ही जागांना(बांधकामाला) आकार देण्यास वचनबद्ध आहोत ज्यामध्ये जीवनाला उलगडणाऱ्या नाविन्यपूर्ण सुंदर कल्पना आणि टिकाऊ सौंदर्याचा समावेश असेल.

बिरलानू विषयी:

बिरलानू (पूर्वीचे एचआयएल लिमिटेड) हा 3 अब्ज अमेरिकन डॉलर्स किंमत असलेल्या सीके बिरला ग्रुपचा भाग असून, हा गृह आणि बांधकाम उत्पादने व सेवा पुरवणारा अग्रगण्य उद्योग आहे. आम्ही घरमालक, बांधकाम व्यावसायिक आणि डिझायनर्ससाठी पाईप्स, बांधकाम रसायने, पुट्टी, छप्पर, भिंती आणि फ्लोअरिंग या क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण उपाय पुरवतो. आमच्या प्रमुख ब्रँड्समध्ये बिरलानू लीकप्रूफ पाईप्स, बिरलानू कन्स्ट्रक्शन केमिकल्स, बिरलानू ट्रूकलर पुट्टी, चारमिनार, बिरलानू एअरोकॉन, पराडोर आणि टॉपलाइन यांचा समावेश आहे.

भारत, जर्मनी आणि ऑस्ट्रियामध्ये ३२ उत्पादन केंद्रे, भारत आणि जर्मनीत संशोधन केंद्रे आणि ८० हून अधिक देशांमध्ये बाजारपेठ असलेल्या बिरलानूने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रमाणपत्रांसह जागतिक दर्जाच्या उत्पादनांची गुणवत्ता कायम राखली आहे. ग्रीनप्रो, आयजीबीसी, पीईएफसी, ब्लू एंजेल आणि ईपीडी यांसारख्या प्रमाणपत्रांनी प्रमाणित आमची उत्पादने जगभरातील व्यावसायिक, आरोग्य, आदरातिथ्य, निवासी आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

५,००० पेक्षा जास्त कर्मचारी आणि भक्कम भागीदारी नेटवर्कच्या मदतीने, बिरलानू भारतातील सर्वोत्तम कार्यस्थळांपैकी(ग्रेट प्लेस टू वर्क) एक म्हणून मान्यता प्राप्त आहे. तसेच “आयकॉनिक ब्रँड’’, “एशियाज मोस्ट ट्रस्टेड ब्रँड’’ आणि “सुपर ब्रँड’’ पुरस्कारांनी सन्मानित आहे.

सीके बिरला ग्रुप विषयी:

सीके बिरला ग्रुप हा 3 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त उत्पन्न असलेला एक भारतीय आंतरराष्ट्रीय समूह आहे. ३५,००० हून अधिक कर्मचारी आणि भारत व जगभरात ५२ उत्पादन केंद्रे असलेल्या या समूहाचे तंत्रज्ञान, ऑटोमोटिव्ह, गृह आणि बांधकाम, तसेच आरोग्यसेवा अशा विविध क्षेत्रांत कार्यक्षेत्र आहे.

बदलत्या जगात आघाडीवर राहण्यासाठी सीके बिरला ग्रुप तंत्रज्ञानाचा वापर करून, लोकांमध्ये गुंतवणूक करून आणि डिजिटल परिवर्तन करून सातत्याने पुढे राहतो आणि फायदेशीर वाढ देतो. जागतिक दृष्टिकोनातून मूल्य निर्मितीकडे पाहताना, आमच्या कंपन्या सीमांच्या पलीकडे जाऊन काम करतात.

सीके बिरला ग्रुपच्या कंपन्यांमध्ये बिरलासॉफ्ट लिमिटेड, जीएमएमसीओ लिमिटेड, नॅशनल इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज लिमिटेड (एनबीसी बेअरिंग्सचे उत्पादक), ओरिएंट सिमेंट लिमिटेड, बिरलानू लिमिटेड (पूर्वीचे एचआयएल लिमिटेड), ओरिएंट इलेक्ट्रिक लिमिटेड, सीके बिरला हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड (सीके बिरला हॉस्पिटल्स आणि बिरला फर्टिलिटी अँड आयव्हीएफ ), ओरिएंट पेपर & इंडस्ट्रीज लिमिटेड, एव्हीटेक लिमिटेड आणि निओसिम इंडस्ट्री लिमिटेड यांचा समावेश आहे.

ग्राहक, भागीदार आणि समाजासाठी विश्वासार्ह संबंधांद्वारे दीर्घकालीन मूल्य निर्माण करणे हा आमच्या कंपन्यांचा मुख्य उद्देश आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
31.3 ° C
31.3 °
31.3 °
40 %
5.2kmh
1 %
Tue
39 °
Wed
41 °
Thu
42 °
Fri
42 °
Sat
42 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!