पुणे, – मागील काही काळात पहिले तर कंटेनर जहाजांचे आकारमान वाढत आहे, ज्यासाठी १८ ते २० मीटर खोल पाणी आवश्यक आहे. भारतातील कोणत्याही बंदरात सर्वात मोठ्या कंटेनर जहाजाला सामावण्यासाठी आवश्यक खोल पाणी नाही.त्या साठी लागणारे खोल पाणी असलेले बंदर अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरेल आणि लॉजिस्टिक्सचा खर्च कमी करेल. या सर्व समस्यांवर ‘वाधवन’ बंदर एक उपाय म्हणून समोर येत आहे.
‘वाधवन’ बंदर कसे भारतीय अर्थव्यवस्थेला योगदान देईल या विषयावर एक अत्यंत माहितीपूर्ण उद्योग तज्ञांची व्याख्यान सत्र सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एसएसपीयू) मधील बीबीए पोर्ट्स आणि टर्मिनल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांना दिले गेले.
पाठक यांनी वाधवन पोर्टच्या स्थानिक फायद्यांवर चर्चा केली आणि त्याचे महत्त्व स्पष्ट केले, या बंदराच्या विकासामुळे विद्यमान प्रमुख बंदरे जसे की जेएनपीटी आणि मुंद्रा यावर असलेला ताण कमी होईल, व्यापाराच्या कार्यक्षमतेला चालना मिळेल, निर्यात क्षमता वाढेल, आणि लॉजिस्टिक्स खर्च कमी होईल. तसेच या व्याख्यानात समुद्री क्षेत्रातील करिअर संधींवर चर्चा करण्यात आली, विशेषत: पोर्ट मॅनेजमेंट, लॉजिस्टिक्स, कस्टम्स हँडलिंग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना या वाढत्या उद्योगामध्ये असणाऱ्या संधींची माहिती देण्यात आली.
महाराष्ट्रात केवळ दोन मोठी बंदरे आहेत, ती म्हणजे मुंबई आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPA), या बंदरांमध्ये कमी खोली असल्याने त्याठिकाणी फक्त छोटे जहाजे थांबू शकतात. याच कारणामुळे मुंबईच्या उत्तर दिशेच्या अरब महासागरातील वाधवन या ठिकाणी एक नवीन बंदर तयार करणे अत्यंत योग्य आणि अनुकूल ठरले आहे, कारण इथे २० मीटर खोल पाणी नैसर्गिकरित्या उपलब्ध आहे, जे सुमारे ४ ½ नॉटिकल मैलांवर आहे. या स्थानाच्या जवळपास १० किमी अंतरावर राष्ट्रीय रेल्वे ग्रीड आणि ३५-४० किमी अंतरावर एनएच 8 आहे. नैसर्गिकरित्या पूरक ही रचना भारताच्या आर्थिक विकासाला मदत करेल.
“विदयार्थ्यांना जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (JNPA) कडून होणाऱ्या वाधवन पोर्टच्या बांधकामाची संकल्पना, वाधवन बंदराच्या कार्यक्षमता, वाधवन या स्थानाचे महत्त्व, अरब समुद्रातील खोल जलस्रोत, बंदराची भूमिका, समुद्री क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी आणि त्यात उत्कृष्टता साधण्यासाठी लागणारी कौशल्ये याबाबत माहिती मिळाली. या व्याख्यानाने विद्यार्थ्यांना निश्चितपणे मदत होईल.” – आशुतोष झुंजूर, सहाय्यक प्राध्यापक, एसएसपीयू