30.5 C
New Delhi
Sunday, July 6, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानआर्थिक वर्ष २०२५ मध्ये सोनालिकाने १,५३,७६४ युनिट्स वार्षिक ट्रॅक्टरची केली विक्री

आर्थिक वर्ष २०२५ मध्ये सोनालिकाने १,५३,७६४ युनिट्स वार्षिक ट्रॅक्टरची केली विक्री

कामगिरीचे श्रेय कंपनीची ग्राहकांशी एकनिष्ठा आणि सतत नावीन्यपूर्णतेला : श्री. रमण मित्तल

पुणे : सोनालिका आणि सोलिस या आघाडीच्या ट्रॅक्टर आणि कृषी यांत्रिकीकरण ब्रँडचे मालक असलेल्या इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडने एकूण १५३७६४ वार्षिक ट्रॅक्टर विक्री आणि एकंदर बाजारपेठेतील १४.८ टक्के वाट्यासह आर्थिक वर्ष २०२५ चा समारोप केला आहे. यात आयटीएलच्या देशांतर्गत बाजारपेठेतील आजवरच्या सर्वोत्तम कामगिरीचा समावेश असून संपूर्ण भारतात तसेच १५० देशांमध्ये लोकप्रिय मिळवित असलेल्या सोनालिकाच्या हेवी ड्युटी ट्रॅक्टर रेंजद्वारे तिला चालना मिळत आहे. याच वर्षी आयटीएल समूहाला फॉर्च्युन ५०० इंडियाने भारतातील टॉप १० ऑटो ब्रँड्सपैकी एक म्हणून मान्यता दिली.

ग्राहकांशी एकनिष्ठा आणि सतत नाविन्यपूर्णता ही मूल्ये आयटीएलमध्ये रूजलेली असून कंपनीला सातत्याने पुढे नेत आहेत. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये सोनालिकाने वन नेशन-वन ट्रॅक्टर-वन प्राईस यासारखी क्रांतिकारी पद्धत अवलंबिली, हा उद्योगातील अशा प्रकारचा पहिला उपक्रम होता. त्यातून ग्राहकांसाठी समानता, पूर्ण विश्वास आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यात आली. ट्रॅक्टरच्या किमती कंपनीच्या वेबसाईटवर प्रदर्शित करणे हे गेल्या दोन वर्षांपासून अजूनही असाधारण पाऊल ठरले असून त्यामुळे शेतकऱ्यांना मन:शांती मिळाली आहे. त्याचबरोबर कंपनीने १८-३२ एचपी सेगमेंटमधील सर्वात मोठे इंजिन असलेली महाराष्ट्रातील चित्ता सिरीज, दमदार हायड्रोलिक्स, नवीन लूक आणि फोरडी कूलिंग सारखे नाविन्यपूर्ण ट्रॅक्टर्स ऑर्कर्ड आणि वाईनयार्ड शेतकऱ्यांसाठी सादर केली. त्यामुळे त्यांना ‘चिता जैसी फुर्ती और रफ्तार’ (चित्त्यासाऱखी चपळता व वेग) मिळण्याची हमी मिळाली.

लोअर एचपी ट्रॅक्टरच्या निर्मितीपासून ते टॉप एंड मोठ्या एचपी ट्रॅक्टर्सपर्यंत, पंजाबमधील होशियारपूर येथील जगातील नंबर १ इंटिग्रेटेड आणि रोबोटिक ट्रॅक्टर प्लांटमधून तयार झालेला प्रत्येक हेवी ड्युटी ट्रॅक्टर शेतकऱ्यांना पूर्ण समाधान देईल, हे आयटीएल ने सुनिश्चित केले आहे.

या संदर्भात बोलताना इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक रमण मित्तल म्हणाले, फॉर्च्युन ५०० या भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत आणि भारतातील टॉप १० ऑटो ब्रँडमध्ये आमची नोंद झालेल्या वर्षाचा समारोप या कामगिरीने होत आहे. विश्वास आणि विश्वासार्हता हा सोनालिकाचा नेहमीच पाया राहिला आहे आणि वन नेशन-वन ट्रॅक्टर-वन प्राईस आणि आमच्या वेबसाइटवर ट्रॅक्टरच्या किंमती दर्शविणे यासारखे आमचे उपक्रम उद्योगात क्रांती घडवत आहेत. इकोसिस्टममध्ये नेहमीच अभाव असलेल्या पारदर्शकतेची खात्री यातून मिळत असून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यास आम्हाला मदत होत आहे.

सर्व समावेशक विकासासाठी आमचे कार्यसंघ तसेच चॅनेल भागीदार आणि इतर भागधारक आमच्या मूलभूत मूल्यांशी जोडलेले राहिले आहेत. नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान असलेले ट्रॅक्टर्स, वर्षभरात उत्पादनात झालेली दमदार सुधारणा आणि जमिनीवरील शेतकऱ्यांशी संपर्क यामुळे आम्ही सर्व क्षेत्रांतील शेतकऱ्यांची पहिली पसंती ठरण्याची खात्री केली आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये शेतकऱ्यांसाठी भरपूर उत्पन्न असलेल्या समृद्ध वर्षाला हातभार लावणारे प्रत्येक पाऊल पुढे टाकण्यासाठी आम्ही आता पूर्णपणे तयार आहोत.’

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
30.5 ° C
30.5 °
30.5 °
72 %
2.5kmh
46 %
Sat
30 °
Sun
37 °
Mon
32 °
Tue
37 °
Wed
36 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!