28.4 C
New Delhi
Wednesday, July 2, 2025
Homeलाईफ स्टाईलनंबर प्लेटमध्ये छेडछाड, बनावटगिरी रोखण्यासाठी ‘एचएसआरपी’अनिवार्य

नंबर प्लेटमध्ये छेडछाड, बनावटगिरी रोखण्यासाठी ‘एचएसआरपी’अनिवार्य

प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे नंबरप्लेटसाठी आवाहन

वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) बसविणे अनिवार्य आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ०१.०४.२०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या नियमानुसार  ०१.०४.२०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने दि. ०१ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित झालेल्या जुन्या नोंदणीकृत वाहनांना ही नंबर प्लेट  बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाहन धारकांना त्यांच्या वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्राकरिता मे. रिअल मेझोन इंडिया प्रा. ली. ही एजन्सी निश्चित करण्यात आलेली असून एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरिता बुकींग पोर्टल https://hsrpmhzone2.in  कार्यान्वित करण्यात आले आहे. वाहनधारकांनी वरील पोर्टलवर बुकींग करुन त्यांच्या सोयीप्रमाणे अपॉईंटमेंट घेवून नंबर प्लेट बसवून घेण्यात यावी. वाहनधारक प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील नोंदणीधारक नसला तरी काही कामानिमित्त या कार्यक्षेत्रामध्ये वाहन वापरत असेल तरी देखील वाहनास  नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे. वाहनधारकांना त्यांच्या वाहनांकर ही नंबर प्लेट बसविण्यासंदर्भात काही तक्रार असल्यास संबंधित सेवापुरवठा धारकांच्या पोर्टलवर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयात दाखल करु शकतात. प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील वाहनधारक व नागरिकांनी  त्यांच्या वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट न बसविल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा उतरविणे/ चढविणे, दुय्यम आरसी/ विमा अद्ययावत करणे इत्यादी कामकाज थांबविण्यात येणार आहे.  ही नंबर प्लेट नसलेली वाहने, बनावट एचएसआरपी नंबर प्लेट असलेली वाहने आदी वाहनांवर सबंधित कार्यालयाकडून भविष्यात दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय मुंबई (मध्य) यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
28.4 ° C
28.4 °
28.4 °
77 %
2.7kmh
21 %
Wed
38 °
Thu
40 °
Fri
38 °
Sat
36 °
Sun
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!