पुणे- : गरजूंना पौष्टिक जेवण दैनंदिनरित्या पुरवण्यासाठी मलाबार समूहाद्वारे सुरू असलेला ‘भूकमुक्त जग’ (हंगर-फ्री वर्ल्ड) हा सीएसआर कार्यक्रम अधिकाधिक लोकांना आणि शहरांचा समावेश करत विस्तारण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास लक्ष्य २ – शून्य भूक यानुसार योजित या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाअंतर्गत सध्या ३१,००० अन्न पाकिटांचे वितरण करण्यात येत आहे. विस्तारीत कार्यक्रमााच भाग म्हणून आता दररोज ५१,००० पौष्टिक अन्न पाकिटांचे वाटप केले जाईल.
पुण्यात आयोजित कार्यक्रमात जागतिक भूक दिन पाळण्यात आला. त्या प्रसंगी, प्रमुख पाहुणे हडपसरचे विधानसभा सदस्य चेतन विठ्ठल तुपे (पाटील) आणि साधना सहकारी बँकेचे अध्यक्ष शुभाष नरसिंग काळभोर, मगरपट्टाचे संचालक आबासाहेब मगर यांच्यासह यांनी या उपक्रमाला हिरवा झेंडा दाखवून कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमादरम्यान संपूर्ण मलाबार व्यवस्थापन संघाने या महत्त्वपूर्ण उपक्रमाशी बांधिलकीची शपथ घेतली. ‘भूकमुक्त जग’ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, मलाबार दररोज १,००० अन्न पाकिटांचे पुण्यात गरजूंना वितरण करत आहे. या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी मलाबार समूहाने अमरावती आणि नागपूर येथे नवीन स्वयंपाकघर सुरू केले आहेत. याव्यतिरिक्त, जागतिक भूकमुक्त दिनाचा भाग म्हणून पश्चिम विभागातून ८,००० अन्न पाकिटांची नव्याने भर घालण्यात आली आहे.
सध्या हा कार्यक्रम आखाती देशांमधील काही केंद्रांव्यतिरिक्त भारतातील केंद्रशासित प्रदेशांसह १६ राज्यांमधील ३७ शहरांमध्ये राबविण्यात येत आहे. विस्ताराचा एक भाग म्हणून, या कार्यक्रमात आता १६ राज्यांमधील ७० शहरांचा समावेश केला जाईल. याशिवाय, जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणकामासाठी ओळखल्या जाणाऱ्या झांबिया या आफ्रिकन देशातील शाळकरी मुलांसाठी देखील हाच कार्यक्रम सुरू करण्याची समूहाची योजना आहे.
“आमच्या आजूबाजूला असे बरेच लोक आहेत जे दिवसातून किमान एक चौरस जेवण मिळविण्यासाठी धडपडत आहेत. आपल्या जगातून भूकेला दूर करण्यासाठी कठोर परिश्रम करणाऱ्या सरकार, यंत्रणा आणि स्वयंसेवा संस्थांना मदतीचा एक छोटासा हात म्हणून आम्ही हा कार्यक्रम सुरू केला आहे,” असे या प्रसंगी एम. पी. अहमद म्हणाले.