26.2 C
New Delhi
Monday, July 7, 2025
Homeविश्लेषणआता मराठीतून देता येणार एमपीएससीच्या सर्वच स्पर्धा परीक्षा !

आता मराठीतून देता येणार एमपीएससीच्या सर्वच स्पर्धा परीक्षा !

राज्यात एमपीएससीच्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याची योजना राज्य सरकार करत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. आमदार मिलिंद नार्वेकर यांनी एमपीएससीच्या परीक्षा मराठीत घेण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. याला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हणाले की, “सध्या अभियांत्रिकी आणि कृषी तांत्रिक पदांच्या परीक्षा इंग्रजीत घेतल्या जातात, कारण संबंधित पुस्तके मराठीत उपलब्ध नाहीत. मात्र, आता अभियांत्रिकी शिक्षण मराठीत घेण्यास परवानगी मिळाल्याने लवकरच या अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीत उपलब्ध होतील. त्यानुसार, सर्व तांत्रिक पदांच्या परीक्षा मराठीत घेण्याचे नियोजन राज्य शासनाने केले आहे,” असे त्यांनी सांगितले.

राज्यातील अभियांत्रिकी आणि कृषी विषयक तांत्रिक पदांच्या परीक्षा मराठीमध्ये घेतल्या जात नसल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अभियांत्रिकी विषयांची पुस्तके मराठीमध्ये उपलब्ध नसल्यामुळे या परीक्षा इंग्रजी भाषेत घेतल्या जातात. पण, आता अभियांत्रिकी शिक्षणही मराठी भाषेत घेण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाची पुस्तके आता मराठी भाषेत उपलब्ध होणार आहेत.  त्या अनुषंगाने अभियांत्रिकी परीक्षांचा अभ्यासक्रम मराठी भाषेत तयार करून सर्व तांत्रिक पदांच्या स्पर्धा परीक्षाही मराठीमध्ये घेण्याचे नियोजन शासनाने केले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.

शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा महामार्ग नागपूरपासून सिंधुदुर्गपर्यंत 12 जिल्ह्यांमधून जाणार असून, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शक्तीपीठांना जोडणारा आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या औद्योगिक तसेच आर्थिक विकासालाही चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत सांगितले.  

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
26.2 ° C
26.2 °
26.2 °
87 %
3.1kmh
100 %
Mon
33 °
Tue
38 °
Wed
36 °
Thu
31 °
Fri
31 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!