सध्या आज काल सर्व वाहने ही इंधन दरवाढीमुळे गॅस चालवली जातात. परंतु ज्यावेळेस गाडीतला गॅस संपला जातो. त्यावेळी प्रवाशांना गाडीतून उतरविले जातात. मग गॅस आणि प्रवाशांचा काय संबंध येतो? तर जाणून घेवू या, की गॅस भरताना प्रवाशांना खाली उतरविले जाते. तर पेट्रोल किंवा डिझेलच्या गाड्या जेव्हा पेट्रोल पंपावर नेल्या जातात, तेव्हा प्रवासी आरामात बसलेले दिसतात. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी इंधन भरण्यात इतका फरक का? चला तर आपण जाणून घेवू या संदर्भातील घडामोडी….
अनेकदा पेट्रोल पंपावर सीएनजी भरण्यापूर्वी प्रवाशांना उतरवण्याचा इशारा लिहिलेला असतो. यामागे सुरक्षेचा प्रश्न असतो.
सीएनजी (कंप्रेस्ड नॅचरल गॅस) गॅस उच्च दाबाखाली साठवला जातो. जर गळती झाली, तर त्याचा स्फोट होऊ शकतो. अशा स्थितीत गाडीतून प्रवाशाला बाहेर काढले आणि जर काही गळती झाली, तर इजा होण्याचा धोका कमी होतो. सीएनजी ज्वलनशील आहे. गळती होऊन आग लागल्यास वाहनाच्या आत लोक अडकण्याचा धोका असतो.
याशिवाय, प्रवाशाला कारमधून बाहेर काढल्याने कारचे वजन कमी होते, ज्यामुळे सीएनजी भरण्याची प्रक्रिया जलद आणि सुलभ होते. कारमध्ये प्रवासी नसताना सीएनजी नोजल टाकीपर्यंत सहज जाता येते. बहुतेक प्रकरणांमध्ये, लोक बाहेरून सीएनजी फिटिंग करून घेतात, ज्यामुळे रिफिलिंगच्या वेळी नॉब शोधण्यात अडचण येते. तसेच, बाजारातील छेडछाडीमुळे धोका वाढतो. पण घाबरण्याची गरज नाही. सीएनजीमध्ये स्फोट होण्याचा धोका असतो हे खरे, पण योग्य ती खबरदारी घेतल्यास तो कमी करता येतो. सीएनजी स्टेशनवर प्रशिक्षित कर्मचारी असतात आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करतात. त्यासाठी योग्य ती काळजी घेतली जसे की… अधिकृत सीएनजी स्टेशनवरूनच सीएनजी भरून घ्या.,सीएनजी भरताना धुम्रपान करू नका किंवा मोबाईल फोन वापरू नका.,तुम्हाला गॅसचा वास येत असल्यास किंवा गळती दिसल्यास, स्टेशन कर्मचाऱ्यांना ताबडतोब सांगा.,तुमच्या कारच्या CNG टाकीची नियमितपणे चाचणी करा.,लक्षात ठेवा की हे नियम केवळ सीएनजी कारसाठीच नाही, तर सर्लाव वाहनांसाठी लागू होतात.