शिरळ (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) वाचनालयाचे संस्थापक गिरीधर रामचंद्र साठे यांनी वाचनालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ग्रंथालय चळवळीविषयी लिहिलेला माहितीपूर्ण लेख –

इ.स. 1698 मध्ये थॉमस क्रे यांनी सोसायटी फॉर प्रमोनिया ख्रिश्चन नॉलेज ही ख्रिश्चन धर्मादाय संस्था स्थापन केली. युके आणि जगभरातील ख्रिश्चन विश्वासाविषयी जागरूकता वाढविण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या मद्रास आणि बंगालमधील 1784 मध्ये कलकत्ता एशियाटिक सोसायटीचे ग्रंथालय अस्तित्वात आहे. शिवथरघळ सतराव्या शतकात श्री समर्थ रामदास स्वामीजी पट्ट शिष्य सुंदरमठ श्री. कल्याणस्वामी यांचे करवी लिहून घेतलेला दासबोध हे देखील एक ग्रंथालयच म्हणावे लागेल. 1835 मध्ये कोलकाता पब्लिक लायब्ररी तर मुंबईत रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ट्रोट ब्रिटन ॲण्ड आर्यलंड (शाखा मुंबई) 1827 साली सुरु झाली, अशा प्रकारे सार्वजनिक ग्रंथालय ही संकल्पना कालक्रमाने मूळ धरू लागली.
आता चळवळ याचा अर्थ एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी, सातत्याने होत असलेला पाठपुरावा, जसे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी, स्वातंत्र्यपूर्व काळात झालेले सत्याग्रह, वंगभंग चळवळ इत्यादी. आधुनिक भारतातील सहकार चळवळ, हरितक्रांतीची चळवळ हरितक्रांतीचे चळवळ तसेच आपली ग्रंथालय चळवळ म्हणता येईल. ‘जे जे आपणास ठावे, ते ते इतरास सांगावे’ अर्थात विविध ग्रंथ लिहून अशा विशाल उद्दीष्ट बाळगणाऱ्या अनेक ज्ञानी जिज्ञासू, अभ्यासू अनुभवी महनीय समाजहितचिंतकांनी आपले ज्ञान ग्रंथ लिहून समाजासमोर ठेवले. अगदी वेद उपनिषदे. रामायण, महाभारत, कुराण, बायबल, दासबोध, चरित्रे, शोधनिबंध एक ना अनेक कविता प्रकारचे ग्रंथ काळानुरूप लिहिले आहे. त्यातील अंतर्मुख कल्याणकारी ज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचावे अशीच लेखनकर्त्यांची धारणा असणार. म्हणून हे ग्रंथ जनसामान्यांना पोहोचावे अशीच लेखनकर्त्यांची धारणा असणार म्हणून हे ग्रंथ जनसामान्यांना वाचनार्थ उपलब्ध करून देणे दिवसेंदिवस गरजेचे वाटू लागले.
म्हणून ग्रंथ आणि संभाव्य वाचक यांच्यात समाज कल्याणार्थ सुसंवाद घडविण्याची ठिकाणे म्हणून आधुनिक ग्रंथालये अस्तित्वात आली. आता ग्रंथालय हे सामाजिक जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून पाहिले जाते. इतकेच काय पण इंग्लंड अमेरिकेसारख्या प्रगत देशात ग्रंथालय सेवा मोफत मिळणे हा व्यक्तीचा हक्क आहे आणि ती त्या त्या राष्ट्राची जबाबदारी आहे, असे घटनाच सांगतात.
म्हणून अशा सार्वजनिक ग्रंथालयांची अगदी देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जास्तीत जास्त निर्मिती करणे, ग्रंथालयाचे सुव्यवस्थापन, प्रशिक्षित सेवक वर्ग आणि बाल वृद्धांपर्यंत विविध वयोगटातील वाचक आणि संभाव्य वाचक प्रयत्नपूर्वक जोडणे आणि अशा प्रकारे समाजात सामाजिक सांस्कृतिक नितीमूल्ये समजून वाचून संस्कृती वर्धनातून चांगला माणूस घडविणे यालाच आधुनिक युगातील ग्रंथचळवळ म्हणावे लागेल. मात्र या चळवळीचे स्वरुप सूर्यचंद्राच्या अस्तित्वाप्रमाणे निरंतर असले पाहिजे.
आता अशा ग्रंथालय निर्मितीचा ध्यास घेतलेल्या समाजातील परोपकारी व्यक्ती, कालपरत्वे स्थापन झालेल्या ग्रंथालय संघासारख्या समान ध्येयाच्या संस्था आणि शासन स्तरावरील शासकीय संस्था या आणि अशा संस्थांचा इतिहास म्हणजेच ग्रंथालय चळवळीचा इतिहास होय –
ग्रंथालय चळवळीचा जागतिक मागोवा घेत काही ठळक गोष्टीचा परिचय होणे गरजेचे आहे.
1) 1848 मध्ये अमेरिकेत मॅसॅच्युसेटस येथे पहिला ग्रंथालय कायदा मंजूर झाला.
2) 1850 मध्ये इंग्लंडमध्ये सार्वजनिक ग्रंथालय कायदा मंजूर होऊन जनतेकडून कर वसूल करून स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत ग्रंथालये स्थापन करण्यात आली व सर्वांना मोफत ग्रंथसेवा मिळू लागली.
3) 1876 मध्ये अमेरिकन लायब्ररी असोसिएशन या ग्रंथालय संघाची स्थापना झाली. 1877 मध्ये ब्रिटिश ग्रंथालय संस्थांची स्थापना होऊन, ग्रंथालयाची स्थापना, ग्रंथालयशास्त्राचे शिक्षण अंतर, ग्रंथालयीन देवघेव आणि ग्रंथालय परिषद या अनेकविध मार्गांनी ग्रंथालय चळवळीचा मोठा हातभार लावला.
4) 1919 च्या कायद्यान्वये इंग्लंडमध्ये काकटी कौनसिल स्थापन झाली.
5) 1964 मध्ये इंग्लंडमध्ये पब्लिक लायब्ररीज ॲन्ड म्युझियम ॲक्ट मंजूर झाला. या कायद्यान्वये सार्वजनिक ग्रंथालयांची व्यवस्था ही राष्ट्राची जबाबदारी आहे हे तत्व मान्य करण्यात आले आणि त्यासाठी आवश्यक तो कर घेण्याची तरतूद करण्यात आली. या कायद्यान्वये इंग्लंडमध्ये 42868 इतक्या मोठ्या संख्येने ग्रंथालय सुरू करण्यात आली. अशाप्रकारे इंग्लंड, अमेरिकेसारख्या प्रगत देशात या चळवळीच कायद्याचे बळ देवून वाचन संस्कृती वर्धनाचे कार्यास वेळोवेळी प्रोत्सान व सरकार दरबारी सन्मानित करण्यात आले.
-गिरीधर साठे (मो. 9420050621)