महाराष्ट्रातील ७वी फ्रँचायझी भव्य उद्घाटनादरम्यान लाँच करण्यात आली
पिपंरी, १५ मे २०२५ आयुशक्ती या जगभरातील आघाडीच्या आयुर्वेदिक आरोग्य केंद्राने आपले स्थानिक विस्तारीकरण सुरू ठेवले आहे. कंपनीने या आठवड्यात पिंपरी-चिंचवडचे झपाट्याने विकसित होत असलेले उपनगर पुनावळे मध्ये नवीन आऊटलेटचे उद्घाटन करण्यात केले.
पुनावळे येथील कोयटे वस्ती रोडवरील गायकवाड नगरातील लॉन्गिट्यूड बिल्डिंग येथे स्थित ही नवीनतम फ्रँचायझी आयुषशक्तीचे महाराष्ट्रातील ७ वे आउटलेट आहे. या नवीन लाँचसह, आयुषशक्तीचे आता महाराष्ट्रातील प्रमुख प्रदेशांमध्ये २९ आउटलेट आहेत, ज्यापैकी १५ फ्रँचायझी आहेत.
नवीन आऊटलेट रूग्णांना तोच सिद्ध वेद सराव आणि आयुर्वेदिक सल्लामसलत व उपचार देत राहिल. या केंद्रामध्ये २ थेरपी कक्ष, २ सल्लामसलत कक्ष आणि २ प्रशिक्षित आयुर्वेदिक तज्ञ आहेत, जे सह-संस्थापक डॉ. स्मिता पंकज नारम आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णा पंकज नारम यांच्याअंतर्गत प्रशिक्षित आहेत. या केंद्रामध्ये रूग्णांसाठी पॅण्ट्री आणि आरामदायी प्रतिक्षा कक्ष देखील आहे.
वैद्य स्मिता नारम प्राचीन आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर आणि डिटॉक्स पंचकर्म तज्ञ आहेत. त्या आयुर्वेदिक सरावाच्या त्यांच्या कौटुंबिक परंपरेमधील वैद्यची पाचवी पिढी आहेत आणि वारसा पुढे घेऊन जात आहेत. त्यांचा या पृथ्वीवरील व्यक्तींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा, व्यक्तींना प्रमाणित प्राचीन उपायांच्या अनुभवाच्या माध्यमातून आनंदी, आरोग्यदायी व सुंदर ठेवण्याचा दृष्टिकोन आहे.
हे आऊटलेट सेवा व उपचारांची व्यापक श्रेणी देईल, जसे डीप पल्स रीडिंग (नाडी परीक्षा), पंचकर्म, स्टीम, मसाज, डिटॉक्सिफिकेशन उपचार, गुणकारी औषधी उपचार, सानुकूल आहार योजना, मार्मा (आयुर्वेदिक प्रेशर पॉइण्ट) तंत्र आणि इतर.
या लाँचप्रसंगी आयुशक्ती टीम सदस्य व फ्रँचायझी मालकांसह आयुशक्तीची मुख्य टीम उपस्थित होती.
नवीन फ्रँचायझीच्या लाँचबाबत मत व्यक्त करत आयुशक्तीच्या सह-संस्थापक डॉ. स्मिता नारम म्हणाल्या, “मला अल्पावधीत महाराष्ट्रामध्ये आणखी एक आऊटलेट लाँच करण्याचा आनंद होत आहे. आम्ही येथील ग्राहकांना सेवा देण्यास आणि त्यांच्यावर उपचार करण्यास उत्सुक आहोत. पृथ्वीवरील व्यक्तींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या आणि त्यांना आरोग्यदायी जीवन जगण्यास मदत करण्याच्या दृष्टिकोनासह आम्ही विस्तारीकरण करत आहोत.”
त्या पुढे म्हणाल्या, “गेल्या वर्षभरात आम्हाला मिळालेला प्रतिसाद अद्भुत आहे, ज्यामुळे आम्ही भारतभरात नवीन आऊटलेट्स सुरू करण्यास उत्सुक आहोत.”
सामुदायिक आरोग्यामध्ये दीर्घकालीन परिवर्तन घडवून आणण्याच्या मिशनसह १९८७ मध्ये आयुशक्ती लाँच करण्यात आली. मास्टर हीलर स्वर्गीय डॉक्टर पंकज नारम आणि त्यांच्या पत्नी स्मिता नारम यांनी सहयोगाने या कंपनीची स्थापना केली. सध्या, कंपनी नऊ देशांमध्ये कार्यरत असून एक दशलक्षहून अधिक ग्राहकांचा उपचार करत आहे, आधुनिक काळातील आयुर्वेदिक पंचकर्म (डिटॉक्स) उपचार व औषधे देत आहे.