पिंपरी, – एचआयव्ही बाधीत ६० टक्के लोकांना क्षयरोगाचा (टीबी) चा प्रादुर्भाव होण्याचा धोका जास्त असतो. एचआयव्हीची बाधा झाल्यास घाबरून न जाता योग्य औषध उपचार, सकस आहार आणि नियमित व्यायाम या त्रिसूत्रीचा अंगीकार केल्यास चांगले आयुष्य जगणे सहज शक्य आहे. या आजारामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते असे मार्गदर्शन नूतन भोसरी रुग्णालयातील आयसीटीसी समुपदेशक अर्चना शिंदे यांनी केले.
नूतन भोसरी रुग्णालय येथे जागतिक एड्स जनजागृती सप्ताह निमित्त आयसीटीसी विभागाच्या वतीने विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये परिसरातील शाळा व अंगणवाडी शिक्षकांना एचआयव्ही, एड्स, क्षयरोग व गुप्तरोग आजारांविषयी माहिती देण्यात आली. एचआयव्ही बाधित रुग्णांनी अधिक माहितीसाठी १०९७ या टोल फ्री क्रमांक संपर्क साधण्याचे आवाज शिंदे यांनी केले.
भोसरी परिसरात जनजागृती फेरी काढण्यात आली.
अर्चना शिंदे वेळी यांनी सांगितले की, सर्व सरकारी रुग्णालयांतील आयसीटीसी सेंटर मध्ये एचआयव्ही बाधित व्यक्तींसाठी सर्व उपचार, तपासणी, चाचणी, मोफत उपलब्ध आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, नूतन भोसरी रुग्णालयाचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी ढगे, डॉ. ऋतुजा लोखंडे, डॉ. सुजाता गायकवाड, डॉ. किरण कांबळे, पीएचएन अनुपम वेले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
एचआयव्ही बाधीतांनी त्रिसूत्रीचा अंगीकार केल्यास चांगले आयुष्य जगणे शक्य – अर्चना शिंदे
नूतन भोसरी रुग्णालयात एचआयव्ही जनजागृती कार्यक्रम
RELATED ARTICLES
New Delhi
overcast clouds
25.7
°
C
25.7
°
25.7
°
87 %
4kmh
100 %
Mon
30
°
Tue
34
°
Wed
35
°
Thu
36
°
Fri
33
°