चिंचवड- चिंचवड मधील महिलांसाठी भजनी मंडळ महासंघाच्या माध्यमातून विठ्ठल महादेव मंदिर व ईशा नेत्रालय यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले होते. यामध्ये तपासणीला सुमारे २५० भगिनी व काही बंधुंची सुद्धा तपासणी करण्यात आली. तसेच ज्यांना पुढील काही तपासण्याची आवश्यकता होती त्यांना नेत्रालयात नेण्याची व्यवस्था ईशा नेत्रालयाने केली होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन दिपप्रज्वलन व भारत माता पुजनाने आणि डोळे तपासणी मशिन पुजनाने झाले. दिप प्रज्वलन मा. नगरसेवक सुरेशभोईर, गणेश मिरजकर, संतोष निंबाळकर, मा. नगरसेविका अश्विनी चिंचवडे, जेष्ठ नागरिक धोंडोपंत सायकर काका व ईशा नेत्रालयाचे यशवंत बोऱ्हाडे व डॉक्टर बंधु-भगिनींनी केले व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ अजित जगताप गुरूजींनी केले. ईशा नेत्रालयच्या डाॅक्टरांनी शिबीरा विषयाची व तपासणी ची माहिती दिली. माधुरी कवी यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अश्विनी नाटेकर ताई, अंजली कुलकर्णी ताई, उज्वला कवडे ताई, दिपाली खासनिस ताई, शलाका कुलकर्णी ताई ह्यांनी सहभागी होऊन अत्यंत नियोजनबद्ध कार्यक्रमासाठी योगदान दिले.
सदर कार्यक्रमाला निंबाळकर, मा नगरसेवक भोईर व गणेश मिरजकर ह्याचे विशेष योगदान लाभले. सर्वं सहकारी व ईशा नेत्रालय यांच्यामुळे कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध व सुंदर पद्धतीने संपन्न झाला.