38.7 C
New Delhi
Friday, July 17, 2026
Homeआरोग्यडॉ. बत्राजकडून ५० अब्ज एक्सोसोम्सच्या शक्तीने युक्त, भारतातील पहिली प्रगत हेअर रिग्रोथ...

डॉ. बत्राजकडून ५० अब्ज एक्सोसोम्सच्या शक्तीने युक्त, भारतातील पहिली प्रगत हेअर रिग्रोथ ट्रीटमेंट ‘हेअरगेन’ सादर.

नवीन एक्सोसोम-आधारित उपचारपद्धती ही केसांच्या पुनरुत्पादक पुनरुज्जीवनाच्या क्षेत्रात एक नवीन मैलाचा दगड ठरली आहे, ती डॉ. बत्राज यांच्या स्वमालकीच्या ट्रायक्सो कॉम्प्लेक्सवर आधारित शस्त्रक्रियाविरहित उत्पादन सादर करते.

पुणे, – : डॉ. बत्राज हेल्थकेअरने ५० अब्ज एक्सोसोम्सच्या शक्तीवर चालणाऱ्या, भारतातील पहिल्या प्रगत केस पुनर्वाढीच्या उपचाराची, ‘हेअरगेन’ची आज घोषणा करून रिजनरेटिव्ह मेडिसिनच्या (पुनरुत्पादक औषधशास्त्र) क्षेत्रात एक नवीन टप्पा गाठला. त्यामुळे केस पुनरुज्जीवनासाठी शस्त्रक्रियाविरहित उपाय शोधणाऱ्या रुग्णांसाठी जगातील सर्वात आश्वासक रिजनरेटिव्ह तंत्रज्ञानांपैकी एक उपलब्ध होत आहे.

केस गळणे ही आता केवळ सौंदर्याची समस्या राहिलेली नाही. भारतातील सर्व वयोगटांतील १५ कोटी लोकांसाठी ही एक भावनिक आणि आत्मविश्वास खच्ची करणारी समस्या बनली आहे.‘हेअरगेन’ हे केस गळण्याच्या विविध टप्प्यांचा आणि कारणांचा अनुभव येणाऱ्या पुरुष आणि महिलांसाठी विकसित करण्यात आले आहे. यामध्ये आनुवंशिक केसगळती (पुरुष आणि महिलांमधील टक्कल पडणे), प्रसूतीनंतरची केसगळती, रजोनिवृत्तीनंतर केस पातळ होणे, तणावामुळे होणारी केसगळती आणि केस पातळ होण्याच्या सुरुवातीच्या टप्प्याचा समावेश आहे. ‘हेअरगेन’ टाळूला थेट शक्तिशाली पुनरुत्पादक संकेत देऊन, सुप्त केसांच्या मुळांना उत्तेजित करते, टाळूचे आरोग्य सुधारते आणि शरीरातील नैसर्गिक केस वाढण्याच्या प्रक्रियेला प्रोत्साहन देते. त्यामुळे कालांतराने केस अधिक जाड, दाट आणि निरोगी दिसण्यास मदत होते.

हा उपचार डॉ. बत्रा यांच्या स्वमालकीच्या ट्रायक्सो कॉम्प्लेक्सवर आधारित आहे. ही एक बहुस्तरीय पुनरुत्पादक पद्धत असून, यामध्ये एक्सोसोम्सच्या शक्तीसोबत पीडीआरएन
(पॉलिडिऑक्सीरिबोन्यूक्लियोटाइड), कोलेजन, कॅफीन, ग्रोथ फॅक्टर्स, पॉलिपेप्टाइड्स आणि कॉपर ट्रायपेप्टाइड्स यांसारखे शास्त्रीय आधारावर निवडलेले घटक एकत्र केले आहेत. हे सर्व घटक एकत्रितपणे कार्य करून खराब झालेल्या केसांच्या मुळांचे पुनरुज्जीवन करतात, टाळूतील सूक्ष्म रक्ताभिसरण सुधारतात, टाळूचा संरक्षक थर मजबूत करतात, केसांच्या वाढीचा सक्रिय टप्पा वाढवतात आणि केसांची घनता व गुणवत्ता वाढवतात. यामुळे केसांच्या मुळांपासून निरोगी वाढीस मदत होते आणि त्याचबरोबर सध्याच्या केसांची ताकद व लवचिकता सुधारते.

एखाद्या व्यक्तीची स्थिती आणि उपचार पद्धतीनुसार, ‘हेअरगेन’मुळे अंदाजे ७५ दिवसांत दिसून येतील अशा सुधारणा अपेक्षित आहेत. तज्ज्ञांच्या क्लिनिकल मार्गदर्शनाखाली निरोगी टाळू, केसगळतीत घट, केसांची मजबूत मुळे, केसांची जाडी आणि घनतेत सुधारणा, तसेच केसांची लक्षणीय वाढीची रुग्ण अपेक्षा करू शकतात. यामुळे हा डॉ. बत्राजच्या उपलब्ध असलेल्या सर्वांत जलद शस्त्रक्रियाविरहित केस पुनरुज्जीवन उपायांपैकी एक ठरतो.

या उत्पादनाच्या आरंभाविषयी टिप्पणी करताना डॉ. बत्राज हेल्थकेअरचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तसेच ट्रायकोलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन (यूके) चे पहिले भारतीय अध्यक्ष डॉ. अक्षय बत्रा म्हणाले: “केसांचे पुनरुज्जीवन एका पूर्णपणे नवीन युगात प्रवेश करत आहे. आजचे ग्राहक विज्ञानावर आधारित असलेल्या, कमीत कमी त्रासदायक असलेल्या आणि शरीराच्या स्वतःच्या पुनरुत्पादक यंत्रणेसोबत काम करून केसांची लक्षणीय वाढ घडवून आणण्यास सक्षम असलेल्या उपायांच्या शोधात आहेत. एक्सोसोम थेरपी ही पुनरुत्पादक औषधशास्त्रातील सर्वात उत्साहदायक प्रगतींपैकी एक आहे, कारण त्यातून केसांच्या सुप्त मुळांना जागृत होण्याचे जोरदार जैविक संकेत मिळतात आणि केसांच्या नैसर्गिक वाढीस मदत होते.”

डॉ. बत्रा पुढे म्हणाले की व्यक्तीच्या स्वतःच्या प्लेटलेट्सच्या गुणवत्तेवर आणि प्रमाणावर ज्यात परिणाम अवलंबून असतात, अशा पीआरपीच्या उलट ‘हेअरगेन’ ५० अब्ज एक्सोसोम्सचा एक प्रमाणित डोस देते, त्यामुळे टाळूला अधिक सातत्यपूर्ण पुनरुत्पादक उत्तेजना मिळते. केस गळण्याच्या सुरुवातीच्या ते मध्यम टप्प्यात असलेल्या अनेक व्यक्तींच्या दृष्टीने केशारोपणासारख्या अधिक गुंतागुंतीच्या प्रक्रियांचा विचार करण्यापूर्वी, हा एक आकर्षक शस्त्रक्रिया-विरहित पर्याय असून त्यामुळे केस पुन्हा उगवण्यासाठी नैसर्गिकरित्या मदत होऊ शकते.”

केस आणि टाळूच्या उपचारांमध्ये चार दशकांहून अधिक अनुभवासह, डॉ. बत्राज हेल्थकेअर वैद्यकशास्त्र, क्लिनिकल संशोधन आणि नावीन्य यांचा मेळ घालणाऱ्या अत्याधुनिक पुनरुत्पादक उपचार पद्धतींमध्ये गुंतवणूक करत आहे. ‘हेअरगेन’ची सुरुवात ही प्रगत जागतिक तंत्रज्ञान भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या आणि सुरक्षित, शास्त्रीय आधार असलेल्या व वैयक्तिकृत उपचार पद्धतींद्वारे केस पुनरुज्जीवनाचे भविष्य नव्याने घडविण्याच्या कंपनीच्या ध्येयातील पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
38.7 ° C
38.7 °
38.7 °
25 %
4.2kmh
71 %
Thu
38 °
Fri
41 °
Sat
39 °
Sun
40 °
Mon
38 °

Most Popular

Recent Comments