33.6 C
New Delhi
Friday, March 14, 2025
Homeआरोग्यवॅक्सिन फॉर होप: युवामुलींमधील सर्वायकल कॅन्सरच्या प्रतिबंधासाठी लशी मोफत पुरवल्या जाणार

वॅक्सिन फॉर होप: युवामुलींमधील सर्वायकल कॅन्सरच्या प्रतिबंधासाठी लशी मोफत पुरवल्या जाणार


पुणे, –आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल (एबीएमएच) आपल्या ‘वॅक्सिन फॉर होप’या उपक्रमाच्या यशस्वी उद्घाटनाची घोषणा अभिमानपूर्वक करत आहे. ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) लशींच्या माध्यमातून सर्वायकल (गर्भाशयमुखाच) कॅन्सरशी लढण्याच्या उद्दिष्टाने हा समुदायकेंद्री उपक्रम सुरू करण्यात आला आहे. उद्घाटन कार्यक्रमाला महाराष्ट्र सरकारमधील महिला व बालविकास खात्याच्या माननीय मंत्री अदिती सुनील तटकरे आणि आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पामेश गुप्ता उपस्थित होते. शिवाय,ग्यािनियो ऑन्को सर्जन डॉ. निखिल परवते, सीनियर कन्स्ल्टहण्टय पेडिएट्रिशियन डॉ. प्रिया मानकरे, सीनियर कन्साल्टिण्टय ऑब्सक अँड ग्याीनेकोलॉजी आयव्ही्एफ स्पेरशालिस्टल डॉ. अमित पटेल यांनीया कार्यक्रमात सर्वायकल कॅन्सरबाबतची माहिती देत प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेप्रती एबीएमएचची अविचल बांधिलकी अधोरेखित केली.


‘वॅक्सिन फॉर होप’ हे अभियान सहा महिन्यांच्या कालावधीत९ ते १४ वर्ष वयोगटातील अल्पवयीन मुलींना मोफत एचपीव्ही लशी पुरवण्यासाठीविचारपूर्वक आखण्यात आले आहे. एचपीव्ही प्रादुर्भावाच्या दृष्टीने अधिक धोका असलेला लोकसंख्येतील वर्ग यासाठी निश्चित करण्यात आला आहे. एचपीव्हीशी निगडित विकारांचा, विशेषत: सर्वायकल कॅन्सरचा, प्रतिबंध करून समुदायाचे आरोग्य अधिक चांगले करण्याच्या एबीएमएचच्या उद्दिष्टाशी हा उपक्रम सुसंगत आहे. रुग्णालयाने पुढील पिढ्यांना सुरक्षित करण्याप्रती तसेच समाजातील आरोग्यव्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याप्रती आपले समर्पण अधिक दृढ करत, लसीकरण शिबिरांच्या आयोजनातही सहाय्य केले आहे.
सर्वायकल कॅन्सर हा भारतातील आरोग्यासंदर्भातील महत्त्वाचा चिंताजनक विषय आहे. देशातील स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या कॅन्सरच्या प्रकारांमध्ये सर्वायकल कॅन्सरचा क्रमांक दुसरा आहे. वर्तमान अंदाजानुसार, दरवर्षी १२३,९०७ स्त्रियांना सर्वायकल कॅन्सरचे निदान होते आणि सुमारे ८०,००० स्त्रियांचा यामुळे मृत्यू होतो.प्रामुख्याने १६ आणि १८ या प्रकारांच्या अतिधोक्याच्या समजल्या जाणाऱ्या एचपीव्ही स्ट्रेन्सच्या प्रादुर्भावामुळे बहुतेकदा सर्वायकल कॅन्सर होतो. एचपीव्ही नाहीसा करणारी लस हा अत्यंत प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे, लसीकरणामुळे सर्वायकल कॅन्सरचे प्रचलन लक्षणीयरित्या कमी होऊ शकते असे अभ्यासांमध्ये लक्षात आले आहे. मात्र, लस घेतली जाण्याचे प्रमाणतरीही कमी आहे. म्हणूनच ‘वॅक्सिन फॉर होप’सारखे उपक्रम या प्रतिबंध करण्याजोग्या आजाराविरोधातील लढ्यात महत्वपूर्णआहेत.
आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पामेश यांनी या उपक्रमाबाबत उत्साह व्यक्त केला. ते म्हणाले, “प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा हा निरोगी समाजाचा पाया आहे, यावर एबीएमएचचा विश्वास आहे. ‘वॅक्सिन फॉर होप’सारखे अभियान म्हणजे आवश्यक साधने व ज्ञानाच्या माध्यमातून सर्वायकल कॅन्सरशी लढण्यासाठी समुदायांना सक्षम करण्याप्रती आमच्या समर्पणाची पावती आहे. मोफत एचपीव्ही लशी पुरवून आपल्या कन्या, बहिणी आणि मातांचे या विदारक तरीही प्रतिबंध करण्याजोग्या आजारापासून संरक्षण करण्याचे उद्दिष्ट आमच्यापुढे आहे.”
महाराष्ट्र सरकारमधील महिला व बालविकास खात्याच्या माननीय मंत्री तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अदिती सुनील तटकरे यांनी रुग्णालयाद्वारे केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची प्रशंसा केली. त्या म्हणाल्या, “आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटलने ‘वॅक्सिन फॉर होप’अभियान सुरू करण्यासाठी घेतलेली द्रष्टी भूमिका प्रशंसनीय आहे. जागरूकता वाढवण्यात तसेच गरजूंना अत्यावश्यक आरोग्यसेवा पुरवण्यात असे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतात. या उदात्त प्रयत्नाचा भाग होणे माझ्यासाठी सन्मानास्पद आहे आणि प्रत्येकाने यात सहभाग घ्यावा म्हणून मी प्रोत्साहन देते.”
एचपीव्ही लसीकरण अभियानाशिवाय, एबीएमएच, सामुदायिक आरोग्य उंचावण्यासाठी अनेक सीएसआर उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहे. यामध्ये स्तन, गर्भाशयमुख (सर्विक्स) मुख आणि अन्य प्रकारच्या कॅन्सरच्या निदानासाठी तपासणी कार्यक्रमांचा तसेच मोतिबिंदू शस्त्रक्रिया, क्लेफ्ट (फाटलेला ओठ) शस्त्रक्रिया आणि बालरुग्णांमधील हृदयशस्त्रक्रिया यांसारख्या अत्यावश्यक वैद्यकीय प्रक्रिया तज्ज्ञांच्या नेतृत्वाअंतर्गतकरून घेण्याचा समावेश होतो. गरजूंना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून घेण्याप्रती एबीएमएचचा सर्वांगीण दृष्टिकोन या उपक्रमांतून दिसून येतो.
‘वॅक्सिन फॉर होप’अभियान केवळ लसीकरण पुरवत नाही, तर सर्वायकल कॅन्सर, त्याची कारणे आणि नियमित तपासणीचे महत्त्व यांबाबत जागरूकताही निर्माण करते. दर्जेदार आरोग्यसेवा पुरवण्याच्या आपल्या उद्दिष्टाशी एबीएमएच बांधील आहे आणि समुदायाच्या स्वास्थ्याला देणारे असे उपक्रम भविष्यकाळातही सुरू ठेवणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
33.6 ° C
33.6 °
33.6 °
15 %
2.8kmh
22 %
Fri
29 °
Sat
36 °
Sun
34 °
Mon
33 °
Tue
34 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!