20.1 C
New Delhi
Tuesday, January 13, 2026
Homeआरोग्यशिवसेनेच्या वतीने हडपसरमध्ये "व्यसनांची होळी"

शिवसेनेच्या वतीने हडपसरमध्ये “व्यसनांची होळी”

जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त तरुणांच्या जनजागृतीचा निर्धार

जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त शिवसेना पुणे शहराच्या वतीने हडपसर मतदारसंघात “व्यसनांची प्रतीकात्मक होळी” करण्यात आली. समाजात वाढत्या प्रमाणात व्यसनाधीनतेकडे वळणाऱ्या तरुण पिढीला सजग करण्यासाठी आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी हा उपक्रम राबवण्यात आला.

या कार्यक्रमात तंबाखू, गुटखा, खैनी, मिश्री, सिगरेट, बिडी, फुके, गर्द, चरस, हिरॉईन, मोर्फीन, मेफेड्रोन अशा अनेक घातक व्यसनांचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. यामार्फत तरुणांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी,शिवसैनिक, महिला आघाडी, युवा सेना आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या उपक्रमाचे नेतृत्व करताना शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, व्यसनाधीनतेमुळे केवळ तरुणांचे आरोग्यच नाही, तर संपूर्ण कुटुंबसंस्था उध्वस्त होत आहे. अनेक कुटुंबांमध्ये दु:ख, दारिद्र्य, हिंसा आणि सामाजिक विस्कळीतपणा या व्यसनांमुळेच निर्माण झाला आहे. हे केवळ वैयक्तिक संकट नाही, तर सामाजिक आपत्ती आहे. दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर तरुण या व्यसनांच्या आहारी जात आहेत, ही अत्यंत धोक्याची घंटा आहे.अशा परिस्थितीत, तरुणांना या विघातक प्रवृत्तींपासून रोखण्यासाठी सातत्याने आणि व्यापक स्वरूपात जनजागृती मोहिमा राबवणे अत्यावश्यक झाले आहे असेही भानगिरे यांनी नमूद केले.

शिवसेना या विषयावर गंभीर असून व्यसनमुक्त पुणे शहराच्या दिशेने ठोस कृती आरंभली आहे.कार्यक्रमाच्या निमित्ताने एक सामूहिक प्रतिज्ञाही घेण्यात आली ज्यामध्ये तरुणांनी आणि शिवसैनिकांनी व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प केला.

शिवसेनेच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक प्रश्नांवर रस्त्यावर उतरून अभियानं राबवली जात आहेत. या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास भाऊ तुपे, पदाधिकारी अमर घुले, पंकज कोद्रे, अभिजीत बोराटे, शक्ती प्रधान, संतोष रजपूत, योगेश सातव, तुषार मरळ, प्रशांत डाबी, तसेच महिला पदाधिकारी प्रतिमा बोबडे, प्रज्ञा आबनावे, आशा यादव, शितल गाडे हे उपस्थित होते. हडपसर परिसरातील शिवसैनिकांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाच्या शेवटी व्यसनमुक्त, सशक्त, आरोग्यदायी समाजनिर्मितीसाठी शिवसेना पुणे शहराकडून यापुढेही ठोस पावले उचलण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. “व्यसनांना नाही म्हणूया, आरोग्याला हो म्हणूया!” असा संदेश देत उपस्थित शिवसैनिकांनी जनजागृतीची ग्वाही दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
20.1 ° C
20.1 °
20.1 °
37 %
3.6kmh
36 %
Tue
20 °
Wed
20 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!