Blood donation camp- पुणे – समाजसेवेचा ध्यास घेतलेल्या
“ द फिनिक्स फाउंडेशन, पुणे” तर्फे एक भव्य आणि समाजहिताचा उपक्रम राबविण्यात येत आहे . राज्यसभा खासदार डॉ. मेधाताई कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये “ भव्य रक्तदान शिबिर व आयुष्मान भारत योजना अभियान” या दुहेरी उपक्रमांचा समावेश आहे.
या उपक्रमाचा उद्देश समाजातील नागरिकांमध्ये आरोग्य, सेवा आणि जबाबदारीची भावना निर्माण करणे हा आहे. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्याला फिनिक्स फाउंडेशनच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. संस्थेच्या म्हणण्यानुसार, “रक्तदान ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे; एखाद्याचे प्राण वाचविण्याचा संधी देणारा हा मानवीतेचा उत्सव आहे.

📌 हा सामाजिक सोहळा येथे पार पडणार आहे.
२६ ऑक्टोबर २०२५ रविवार, रोजी
सकाळी १० ते सायं. ५
कार्यक्रमाचे ठिकाण आहे – सहकार उद्यान, हॉटेल स्वीकार लेन, नळ स्टॉपजवळ, एरंडवणा, पुणे. 📌
फिनिक्स फाउंडेशनकडून “आयुष्मान भारत योजना अभियान” देखील राबविले जाणार आहे. या योजनेअंतर्गत ७० वर्षे आणि त्यापुढील वयोगटातील नागरिकांना आरोग्य कवच देण्यासाठी मोफत नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये रेशन कार्ड, आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.

📌 रक्तदान अथवा आयुष्मान भारत योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी आपली माहिती व्हॉट्सअॅपद्वारे पाठवायची आहे.
▪️माहिती पाठवताना आपल्याला “रक्तदान” किंवा “आयुष्मान कार्ड” करायचे आहे हे नमूद करून, सोबत नाव आणि पत्ता लिहिणे आवश्यक आहे. संपर्कासाठी दिलेले क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत – 8459543944.
या उपक्रमाचे आयोजन सौ. यामिनी अमोल मठकरी, संस्थापक व अध्यक्ष – द फिनिक्स फाउंडेशन पुणे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले आहे. सामाजिक कार्य आणि जनजागृती क्षेत्रात सतत कार्यरत असलेली फिनिक्स फाउंडेशन ही संस्था नेहमीच आरोग्य, शिक्षण आणि स्त्री-सक्षमीकरण अशा विविध सामाजिक विषयांवर काम करत आली आहे.

“मा.राज्यसभा खासदार प्रा.डॉ. मेधाताई कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवून आम्ही त्यांच्या समाजसेवेच्या कार्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत”.
– सौ.यामिनी मठकरी
संस्थापक/अध्यक्ष द फिनिक्स फाउंडेशन पुणे
फिनिक्स फाउंडेशन पुणेच्या वतीने समाजसेवेसाठी एक पाऊल पुढे!
– समाजहितासाठी रक्तदान करणे किंवा आरोग्यसुरक्षेच्या दृष्टीने आयुष्मान कार्ड घेणे. या दोन्ही मार्गांनी आपण एखाद्याच्या जीवनात प्रकाश आणू शकतो, हेच या उपक्रमाचे खरे वैशिष्ट्य असल्याचे या संस्थेच्या माध्यमातून दिसून येत आहे.
शिबिराचे ठिकाण :
सहकार उद्यान, हॉटेल स्वीकार लेन, नळ स्टॉप जवळ, एरंडवणा, पुणे
दिनांक: 26 ऑक्टोबर 2025 रविवार
वेळ: सकाळी 10 ते सायं. 5
संपर्क क्रमांक: 8459543944