8.1 C
New Delhi
Friday, January 9, 2026
Homeआरोग्यसंत निरंकारी मिशनद्वारा धायरी येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

संत निरंकारी मिशनद्वारा धायरी येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

धायरी, – निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज एवं निरंकारी राजपिता जी यांच्या आशीर्वादाने पुणे झोन मधील धायरी येथे मानवतेच्या कार्यासाठी नेहमीच अग्रेसर असणाऱ्या संत निरंकारी मिशन ची सामाजिक शाखा, संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार, २१ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले होते. ज्यामध्ये मिशनचे अनुयायी आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन २५६ युनिट रक्त संकलन करण्यात आले. संत निरंकारी रक्तपेढी यांनी १५१ युनिट, औंध रुग्णालय रक्तपेढी यांनी १०५ युनिट रक्त संकलन करून विशेष योगदान दिले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अनिल भावेकर जी, राजाभाऊ लायगुडे, राजश्रीताई नवले, हरिदास चरवड, ज्योतीताई गोसावी मा. नगरसेवक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


संत निरंकारी मिशनद्वारे बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे अमलात आणला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे.
संत निरंकारी मिशन द्वारा धायरी परिसरामध्ये मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी, नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते.
रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल, मिशन चे अनुयायी यांचे विशेष योगदान लाभले. दरम्यान रक्तदान जागृती जनसामान्यांमध्ये व्हावी यासाठी धायरी परिसरात घरोघरी जाऊन रक्तदानाचा संदेश पोहोचविण्यात आला.आलेल्या सर्व रक्तदात्यांचे व मान्यवरांचे आभार परमेश्वर हेळकर तसेच पांडुरंग दळवी (सेवादल संचालक) यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
fog
8.1 ° C
8.1 °
8.1 °
87 %
1kmh
0 %
Fri
20 °
Sat
21 °
Sun
21 °
Mon
21 °
Tue
19 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!