34.1 C
New Delhi
Sunday, May 31, 2026
Homeक्रीड़ापिंपरी चिंचवड महापालिकेचा दणदणीत विजय

पिंपरी चिंचवड महापालिकेचा दणदणीत विजय

पिंपरी, -: पुणे आंतर कचेरी असोसिएशनतर्फे आयोजित अंतरकचेरी व्हॉलीबॉल स्पर्धा दि. १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी पुण्यातील डेक्कन जिमखाना व्हॉलीबॉल कोर्ट येथे उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठित स्पर्धेत पिंपरी चिंचवड महापालिकेने पुन्हा एकदा आपला दबदबा कायम ठेवत विजेतेपद पटकावले. एकूण १४ खेळाडू, संघव्यवस्थापक आणि मार्गदर्शकांसह महापालिकेच्या दोन संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.

सदर संघात महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभाग, पर्यावरण अभियांत्रिकी विभाग, अग्निशामक विभाग, सुरक्षा विभाग, पाणीपुरवठा विभाग, माध्यमिक शिक्षण मंडळ, क्रीडा विभाग, कीटकनाशक विभाग आणि उद्यान विभाग अशा विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समावेश होता. विभागनिहाय एकत्रित सहभागामुळे या विजयाला अधिक व्यापक आणि प्रेरणादायी महत्त्व प्राप्त झाले.

अंतिम सामन्यात पिंपरी चिंचवड महापालिका ‘अ’ संघाने जबरदस्त खेळ कौशल्य सादर करत पुणे शहर पोलीस संघाचा २–० असा धुव्वा उडवला. संघातील कर्णधार सुहास नाईक, उपकर्णधार दशरथ वाघोले, सोमनाथ वीर, विजय गांगुर्डे, अजय घोगरे, संस्कार चव्हाण आणि अंकुश लोहकरे यांनी उत्कृष्ट खेळी करून संघाची ताकद अधोरेखित केली.

तसेच, पिंपरी चिंचवड महापालिका ‘ब’ संघाने देखील भक्कम कामगिरी करत चतुर्थ क्रमांक मिळवला. ‘ब’ संघात हरिभाऊ साबळे, सोमनाथ मोरे, राजवैभव महजराव, हर्षद कदम आणि घनश्याम कदम यांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली.

दोन्ही संघांना क्रीडा पर्यवेक्षक दीपक कन्हेरे यांनी केलेले उत्कृष्ट मार्गदर्शन यशप्राप्तीमध्ये महत्त्वाचे ठरले. विशेष म्हणजे, महापालिकेने या अंतरकचेरी स्पर्धेत सलग दहाव्या वर्षी अजिंक्यपद मिळवत ऐतिहासिक कामगिरीची परंपरा कायम ठेवली आहे.

…….

कोट:

“पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दोन्ही संघांनी दाखवलेला जिद्द, संघभावना आणि शिस्त वाखाणण्याजोगी आहे. सलग दहाव्या वर्षी अजिंक्यपद मिळवणे ही संपूर्ण शहरासाठी अभिमानाची बाब आहे. खेळाडू आणि मार्गदर्शकांचे मनःपूर्वक अभिनंदन.”

— रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महापालिका

कोट:

“महानगरपालिकेचे कर्मचारी केवळ प्रशासकीय कामातच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. ही सातत्यपूर्ण जिंकण्याची परंपरा मेहनत, समर्पण आणि योग्य मार्गदर्शनाचा परिणाम आहे. सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन.”

— विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
34.1 ° C
34.1 °
34.1 °
43 %
4.1kmh
40 %
Sun
34 °
Mon
38 °
Tue
41 °
Wed
43 °
Thu
42 °

Most Popular

Recent Comments