34 C
New Delhi
Saturday, July 25, 2026
HomeTop Five Newsजिल्ह्यातील ६२ हजार शेतकऱ्यांचे ५२३ कोटींचे कर्ज माफ

जिल्ह्यातील ६२ हजार शेतकऱ्यांचे ५२३ कोटींचे कर्ज माफ

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची माहिती


पुणे – राज्य शासनाच्या पुण्योक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ जिल्ह्यातील ६१ हजार ९०० शेतकऱ्यांना होणार असून त्यांचे प्रत्येकी दोन लाख रुपये असे एकूण ५२३ कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार असल्याची माहिती राज्याच्या उपमुख्यमंत्री, पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी येथे शुक्रवारी दिली. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार असून कर्जमाफीच्या याद्या अद्ययावत झाल्यानंतर या योजनेतील खातेदार शेतकऱ्यांची संंख्या आणि योजनेची व्याप्ती वाढेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (farmer)


‌’जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित ‌’अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजने‌’चे उद्धाटन सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुक्रवारी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे झाले. राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शितोळे यावेळी उपस्थित होते. (sunetra pawar)


त्या म्हणाल्या, ‌’अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजने‌’अंतर्गत जिल्हा बँकेच्या माध्यमातून एक हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. शेती व्यवसायात तंत्रज्ञानाची आवश्यकता ओळखून शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात ५०० कोटींची तरतूद केली होती.
‌’कर्जमुक्ती योजनेमुळे शेतकरी कर्जाच्या ओझ्यातून मुक्त होऊन पुन्हा ऊर्जेने काम करू शकणार आहेत. ऊस शेतीमध्ये एआयचा वापर वाढवल्यास उत्पादनात ४० टक्के वाढ होईल तसेच पाणीबचत आणि खतांचा वापर कमी होईल,‌’ असे पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ‌’राज्यातील गोदामे अन्नधान्याने भरलेली असली तरी खतांचा अतिवापर ही धोŠयाची घंटा आहे. रासायनिक खतांमुळे त्वचेचे आजार वाढत आहेत. केस आणि नखे सडण्याचे प्रकार काही गावांमध्ये घडले आहेत. शेतकऱ्यांनी विषमुक्त अन्नधान्याच्या उत्पादनासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे,‌’ असे बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
तर, राज्यातील शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी योजना राबविण्यात आली आहे. सरकार शेकतऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून सर्वोतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
जिल्हा बँकेचे आणि स्वर्गीय अजित पवार यांचे संबंध उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मांडतानाच अजित दादांची जुनी आठवण सांगितली. फेब्रुवारी १९९१मध्ये अजित पवार बँकेचे संचालक झाले. त्या दिवशी दीराच्या लग्नानिमित्त रिसेप्शन होते. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर गुलालाने माखलेले सर्व संचालक त्याला उपस्थित होते, असे सुनेत्रा यांनी सांगितले. बँकेच्या कारभारावर त्यांचे बारकाईने लक्ष होते. शेती, शेतकरी आणि सहकार हेच अजितदादांचे आयुष्य होते. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास त्यांनी बँकेच्या माध्यमातून केला. त्यांच्या दृूरदृष्टीमुळे जिल्हा बँक राज्यात सर्वोत्कृष्ट ठरल्याचे सुनेत्रा यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
34 ° C
34 °
34 °
48 %
2.9kmh
98 %
Sat
34 °
Sun
37 °
Mon
38 °
Tue
33 °
Wed
32 °

Most Popular

Recent Comments