34.9 C
New Delhi
Saturday, July 25, 2026
HomeTop Five Newsराज्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई – राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला असून अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शŠयता व्यक्त करण्यात आली आहे. मान्सूनची प्रणाली अधिक सक्रिय झाल्यामुळे तसेच गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रातील बहुतांश भागांवर होत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.


विशेषत: पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार, तर काही भागांत अत्यंत मुसळधार पावसाची शŠयता वत©विण्यात आली आहे. दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्येही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (rain)


दरम्यान, गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामातील शेती कामांना वेग आला आहे. धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदियामध्ये धान लागवडीची कामे वेगाने सुरू असून शेतकरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात मेहनत घेत आहेत. धान लागवडीसाठी महिला मजुरांची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झाल्याने ग्रामीण भागात स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत.


याउलट अकोला जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ७८ टक्के पावसाची नोंद झाली असून जवळपास ५० हजार हेŠटर क्षेत्रावरील खरीप पेरणी अद्याप बाकी आहे. पावसाची २२ टक्के तूट असल्याने धरणांमधील पाणीसाठाही अपेक्षेपेक्षा कमी आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पात केवळ २० टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने चिंता वाढली आहे. उशिरा पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनानुसार अल्पकालीन पिकांची निवड करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.


अल्प कालावधीत अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद होत असल्याबाबत भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी वातावरणातील बदल, मान्सूनच्या प्रणालीतील चढ-उतार, एल निनो आणि ला निना यांसारख्या हवामान घटकांचा प्रभाव तसेच वाढते प्रदूषण ही प्रमुख कारणे असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करत आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
34.9 ° C
34.9 °
34.9 °
45 %
4.3kmh
92 %
Sat
35 °
Sun
37 °
Mon
39 °
Tue
35 °
Wed
31 °

Most Popular

Recent Comments