30.7 C
New Delhi
Tuesday, July 21, 2026
Homeक्रीड़ामराठी माणसाचा जागतिक पराक्रम!

मराठी माणसाचा जागतिक पराक्रम!

पुणे : तुकाई दर्शन येथील रहिवासी तसेच सिरम इन्स्टिट्यूटचे इंटरनॅशनल बिजनेस विभागाचे वरीष्ठ अधिकारी श्री. नितीन निकम यांनी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवत Vic Clapham पदक पटकावले.

ही मॅरेथॉन जगातील सर्वात जुनी व कठीण स्पर्धा मानली जाते. डर्बन ते पिटर्मॅरिट्झबर्ग या दरम्यानची तब्बल ८७ किलोमीटरची शर्यत श्री. निकम यांनी १४ जून २०२६ रोजी ११ तास ५६ मिनिटांत पूर्ण केली. दीर्घ अंतर, कठीण चढ-उतार, डोंगराळ मार्ग तसेच शारीरिक व मानसिक सहनशक्तीची कठोर परीक्षा घेणारे दहा प्रमुख घाटरस्ते ही या स्पर्धेची वैशिष्ट्ये आहेत.

या स्पर्धेत शारीरिक व मानसिक ताकदीची मोठी कसोटी लागते. श्री. निकम यांच्या यशामागे रनोहोलिकसचे संस्थापक डॉ. योगेश सातव यांच्या प्रशिक्षणाचा मोठा वाटा आहे. कठोर तयारीमुळे त्यांना स्पर्धेत उत्तम कामगिरी करता आली. त्यासाठी त्यांचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
light rain
30.7 ° C
30.7 °
30.7 °
66 %
4kmh
95 %
Tue
33 °
Wed
36 °
Thu
35 °
Fri
36 °
Sat
35 °

Most Popular

Recent Comments