नवी दिल्ली –
भारतीय बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूनं पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आहे. पी.व्ही.सिंधूनं जपान बॅडमिंटन ओपन ७५०च्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दिमाखात धडक मारली आहे. सिंधूनं चमकदार कामगिरी करत ऑलिम्पिक चॅम्पियन चॅन युफेईचा सरळ दोन सेट्समध्ये धुव्वा उडवत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. सिंधूनं उपांत्य फेरीत चॅन युफेईचा २१-१९, १५-१० असा पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. चिनी बॅडमिंटनपटू चॅन युफेईनं हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे माघार घेतल्यानं सिंधूला अंतिम फेरीचं तिकीट मिळालं आहे. उपांत्य फेरीत आक्रमक खेळ केल्यानं सिंधूचंच या लढतीवर वर्चस्व पाहायला मिळालं.
सिंधूची स्पर्धेतील कामगिरी
सिंधूनं यंदा जपान बॅडमिंटन ७५० स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे, त्याचीच झलक उपांत्य फेरीच्या लढतीत पाहायला मिळालं. सिंधूनं आक्रमक खेळ करत पहिल्या सेटपासून युफेईला बॅकफूटवर नेलं. मात्र युफेईनं पहिल्या सेटमध्ये जोरदार कमबॅक करत पहिला सेट १९-१९ असा आणला. परंतु सिंधूनं डगमगून न जाता संयमानं खेळ करत पहिला सेट २१-१९ असा जिंकून आघाडी घेतली. सिंधूनं दुसऱ्या सेटमध्ये आक्रमक खेळ करत आपला दबदबा प्रस्थापित करत १५-१० अशी आघाडी घेतली. मात्र यावेळी युफेई हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्रासात दिसली आणि शेवटी युफेईनं स्पर्धेतून माघार घेतली आणि सिंधूचा अंतिम फेरीचा प्रवास सुकर झाला. हा विजय सिंधूच्या २०२६मधील कमबॅकचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.
सिंधूनं प्रथमच गाठली जपान बॅडमिंटन ओपनची अंतिम फेरी
पी.व्ही.सिंधूनं प्रथमच जपान बॅडमिंटन ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. सिंधूनं या वर्षी जागतिक क्रमवारीत १८व्या स्थानावरुन सुरुवात केली. यावेळी सिंधूनं प्रत्येक स्पर्धेत दमदार प्रदर्शन करत आपल्या रँकिंगमध्ये सुधारणा करत जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी झेप घेतली. आणि हाच तिच्या पुनरागमानाचा एक मोठा पुरावा आहे. आता रविवारी स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूचा मुकाबला जपानच्या अकाने यामागुची किंवा इंडोनेशियाची कुसुमा वर्दानी यांच्यातील एकीशी होणार आहे.
पी.व्ही.सिंधूची ऐतिहासिक कामगिरी !
पहिल्यांदाच गाठली जपान बॅडमिंटन ओपनची अंतिम फेरी
New Delhi
overcast clouds
37
°
C
37
°
37
°
33 %
3.9kmh
95 %
Sun
39
°
Mon
37
°
Tue
30
°
Wed
34
°
Thu
33
°


