अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ वारजे शाखा व जनकल्याण रक्तपेढी यांचे संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन खडकवासला विधानसभा परीक्षेत्राचे आमदार भीमरावअण्णा तापकीर यांचे हस्ते करण्यात आले.
ह्या प्रसंगी तापकीर यांनी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या कार्याचे विशेष कौतुक केले व ब्राह्मण समाज हा नेहमीच सर्व समाजांच्या मदतीसाठी कार्यतत्पर असतो असे प्रशंसोद्गार काढले, ह्यानिमित्त श्री.हेमंत कासखेडीकर, श्री.अभिनव पाठक, श्री मंदार रेडे ह्यांनी अण्णांना शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. तसेच ह्यासमयी अण्णांनी रक्तदात्यांबरोबर संवादसुद्धा साधला.

ह्या कार्यक्रमासाठी विविध भागातील नागरिक व महिलांनी तसेच मेघवर्षा सोसायटीमधील रहिवाशी व महासंघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी उस्फूर्त रक्तदान करून मोठा प्रतिसाद दिला.
ह्या रक्तदान कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष श्री.हेमंत कासखेडीकर ह्यांनी केले तर सूत्रसंचालन सौ स्वाती वर्तक ह्यांनी केले तर महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री.मंदार रेडे ह्यांनी महासंघाच्या वतीने उपस्थित रक्तदात्यांबरोबर संवाद साधला. तसेच जिल्हा महिलाआघाडी अध्यक्ष सौ.केतकी कुलकर्णी व वारजेशाखा महिलाआघाडी अध्यक्ष शैला सोमण, उपाध्यक्ष सौ.जयश्री कासखेडीकर ह्यांनी उपस्थित महिला रक्तदात्यांबरोबर संवाद साधला तसेच वारजे शाखाअध्यक्ष अभिनव पाठक ह्यांनी जास्तीतजास्त लोकांनी रक्तदान करावे असे आवाहन केले.
ह्या कार्यक्रमासाठी महासंघाचे विविध पदाधिकारी सौ.वृषाली शेकदार, विजय शेकदार, सौ.शिल्पा महाजनी, दिपक महाजनी, रंगोली देशमुख, सौ.अश्विनी कौसाडीकर, दत्तात्रय देशपांडे, सौ.जयश्री घाटे ह्यांनी उपस्थिति लावली. ह्या कार्यक्रमासाठी वारजे नगरातून लोकप्रतिनिधी श्री.वासुदेव भोसले, किरण बारटक्के, गणेश वरपे आदींनी शुभेच्छा दिल्या.
ह्या कार्यक्रमात जनकल्याण रक्तपेढीतर्फे डॉ.कांबळे व श्री.संतोष अनगोळकर यांनी थॅलॅसीमिया व इतर रक्तसंक्रमित आजारारांविषयी उपस्थितांना बहुमोल मार्गदर्शन केले.
ह्या कार्यक्रमासाठी मेघवर्षा सोसायटीने त्यांचा हॉल व साहित्य उपलब्ध करून दिले तसेच रहिवासी श्री. विरल गांधी यांनी खूप सहकार्य केले, त्याकरिता सोसायटीचे चेअरमन श्री.दीक्षित यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ह्या कार्यक्रमासाठी महासंघाच्या विविध शाखांचे पदाधिकारी श्री.दत्तात्रय देशपांडे, जयश्री घाटे, शिल्पा महाजनी दिपक महाजनी ह्यांनी उपस्थिति लावली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इतर पदाधिकारी सुनिल क्षीरसागर, सौ.गौरी पाटणकर, कु.अवंतिका पाटणकर, श्रीराम पाटणकर, अमेय पाटणकर, सौ.मोनिका मोहरीर, सौ.मृणाल पाठक, सौ.प्राजक्ता देव आदींनी परिश्रम घेतले.


