20.1 C
New Delhi
Wednesday, November 5, 2025
Homeआरोग्यकर्णबधिर विद्यार्थ्यांची आंतरशालेय एकांकिका स्पर्धा पुण्यातविद्या महामंडळ संस्थेच्या मूक-बधिर शिक्षण संशोधन व...

कर्णबधिर विद्यार्थ्यांची आंतरशालेय एकांकिका स्पर्धा पुण्यातविद्या महामंडळ संस्थेच्या मूक-बधिर शिक्षण संशोधन व विकास केंद्रातर्फे उपक्रम

पुणे : विद्या महामंडळ संस्थेच्या मूक-बधिर शिक्षण संशोधन व विकास केंद्रातर्फे कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शुक्रवार, १९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता घोले रस्त्यावरील पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे होणार आहे, अशी माहिती डॉ. अ.ल. देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कार्यवाह विद्या महामंडळ लिलाधर गाजरे, मुक बधिर विभागाचे महेंद्र अर्विकर व अश्विनी जोशी
यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण ८ कर्णबधिर शाळा शाळांचा
सहभाग असून १०५ कर्णबधिर विद्यार्थी आपली कला सादर करणार आहेत. स्पर्धा दुपारी १२ ते ३.३० या वेळेत होणार असून, त्यानंतर लगेचच बक्षिस वितरण समारंभ ३.३० वाजता होणार आहे.

आधार मूकबधिर विद्यालय, धायरी मूकबधिर विद्यालय, भावे हायस्कूल, चिंचवड बधिर मूक विद्यालय, हडपसर बधिर मूक विद्यालय, आपटे प्रशाला मूकबधिर विद्यालय, अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट, बधीर मूक विद्यालय सुऱ्हुद मंडळ या शाळा स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेचे परीक्षण प्रख्यात नाट्य व कला क्षेत्रातील मान्यवर करणार असून, उषा उंडे, विनिता पिंपळखरे आणि सुधांशु पानसे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
या मध्ये प्रथम व द्वितीय क्रमांकास मोमेंटो व उत्कृष्ट संगीत, उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट दिग्दर्शन आणि उत्कृष्ट लेखनाला मोमेंटो व रोख रकमेचे पारितोषीक देण्यात येणार आहे.
कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या कलेला उत्तेजन मिळावे व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा भरविण्यात येते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
20.1 ° C
20.1 °
20.1 °
88 %
1.5kmh
75 %
Wed
31 °
Thu
31 °
Fri
29 °
Sat
29 °
Sun
27 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!