पुणे- सप्टेंबर महिना हा आंतरराष्ट्रीय बाल कॅन्सर जनजागृती महिना म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय बालकॅन्सर जनजागृती महिन्यानिमित्त एक्सेस लाईफ असिस्टंट फाउंडेशन तर्फे पुण्यात सलग तिसऱ्या वर्षी ‘गोल्डन इव्हिनिंग’ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने ऐतिहासिक आगाखान पॅलेसवर सुवर्ण प्रकाशात योजना केल्याने परिसर उजळून निघाला होता, आणि शहरात एक वेगळीच उर्जा व आशेचा संदेश पसरला.
या रंगतदार सोहळ्याला अर्जुन पुरस्कार विजेते कॅप्टन गोपाल देवांग आणि बॉक्सिंग चॅम्पियन प्रकाश काकडे यांची विशेष उपस्थिती लाभली, त्यांनी बालयोद्ध्यांना “ ढिशुम टू कॅन्सर!” चा मौल्यवान संदेश दिला. त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण वातावरणात धैर्य, सकारात्मकता व लढण्याची ताकद संचारली.

कार्यक्रमात कल्याणी सालेलकर आणि त्यांच्या समूहाने आकर्षक नृत्यसादर केले. या प्रसंगी बिशप्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून या उपक्रमाला मोठ्या उत्साहात प्रोत्साहन दिले.
या कार्यक्रमातील सर्वात भावनिक क्षण म्हणजे लहान शूरवीर आणि त्यांच्या कुटुंबियांसोबतचे संवाद – त्यांचे हास्य, त्यांची ताकद आणि त्यांचे धैर्य हेच सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले.
या प्रसंगी एक्सेस लाईफ चे संस्थापक गिरीश नायर आणि अंकीत दवे, तसेच एक्सेस लाईफ पुणे केंद्र व्यवस्थापक डॉ. चंदन धर्मराज उपस्थित होते. यांच्या नेतृत्वाने आणि पाठबळामुळे हा उपक्रम अधिक भक्कम आणि प्रभावीपणे यशस्वी करण्यात आला.

ऍक्सेस लाईफ पुणे केंद्राच्या वाढीबरोबरच स्वयंसेवक, पुणेकर समर्थकांची मिळालेली साथीमुळे हा उपक्रम अधिक व्यापक व प्रभावी झाला.
‘घरापासून दूर पण घरासारखे’ या उद्दिष्टाने बालकॅन्सरशी लढणाऱ्या मुलांना सुरक्षित, स्वच्छ व आपुलकीचे निवासस्थान देणे हा ॲक्सेस लाईफचा प्रमुख उद्देश आहे.