31.1 C
New Delhi
Thursday, September 18, 2025
Homeआरोग्यमहिलांसाठी मोफत नेत्र चिकित्सा शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

महिलांसाठी मोफत नेत्र चिकित्सा शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी,- मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यात कोरडेपणा वाढतो. चष्म्याचा नंबर सारखा बदलतो. हे टाळण्यासाठी मोबाईल,लॅपटॉप संगणकाचा वापर कमी करावा, पापणीची सतत उघडझाप करावी, भरपूर पाणी प्यावे, दर एक तासांनी डोळ्यांना विश्रांती द्यावी, आकाशाकडे पहावे अशा टिप्स ईशा नेत्रालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. वैभव अवताडे यांनी नेत्र तपासणी शिबिरात दिल्या.
ईशा नेत्रालय आणि वर्षा सातुर्डेकर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत सौ. वर्षा नंदकुमार सातुर्डेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ईशा नेत्रालय चिंचवड स्टेशन येथे महिलांसाठी मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. अवताडे बोलत होते.
नेत्रचिकित्सा शिबिराचे उद्घाटन ईशा नेत्रालयाचे चिंचवड शाखा प्रमुख दीपक कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी संयोजक नंदकुमार सातुर्डेकर, डॉ. जयशील नाझरे, मार्केटिंग मॅनेजर यशवंत बो-हाडे, शिवानी शिंदे, दुर्वांक्षी पाटील, प्राची इनामदार, राधा सातुर्डेकर उपस्थित होते.
यावेळी आधुनिक पद्धतीने नेत्र तपासणी करण्यात आली त्याबरोबरच डोळ्यांचे आजार तसेच डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत डॉ. वैभव अवताडे, डॉ. जयशील नाझरे यांनी मार्गदर्शन केले.
तपासणीसाठी आलेल्या महिलांनी विचारलेल्या विविध शंकांचे यावेळी डॉ. अवताडे यांनी निरसन केले. सकाळी उठल्यावर डोळ्यांना लाळ लावणे योग्य आहे का? या प्रश्नावर ते म्हणाले की,असे करणे अयोग्य आहे. कारण आपण ब्रश केलेला नसतो, बॅक्टेरिया वाढलेले असतात. काळे बुबुळ निकामी होऊ शकते.
डोळ्यांवर पाणी मारावे का ? असे विचारले असता डोळ्यात अश्रूचे प्रमाण कमी असते. पाणी मारून शिल्लक अश्रू आपण वाहून घालवतो त्यामुळे डोळ्यावर पाणी मारणे अयोग्य असल्याचे ते म्हणाले.
आपल्या भाषणात आहारात ओमेगा ३ फॅटीऍसिड असणे गरजेचे असल्याचे डॉ. अवताडे यांनी सांगितले. त्यावर हे कोणत्या पदार्थात असते असा प्रश्न केला असता यासाठी तीळ, जवस बदाम मासे खाल्ले पाहिजेत असे ते म्हणाले.
यावेळी सेंटर हेड दीपक कदम म्हणाले की, ईशा नेत्रालयाच्या महाराष्ट्रात आठ शाखा आहेत. नववी शाखा लवकरच वाकड येथे होत आहे. सर्व मशिनरी युएसइडीए मान्यताप्राप्त आहे. ॲडव्हान्स तंत्रज्ञान जर्मन टेक्नॉलॉजी, जागतिक व अत्याधुनिक सुविधा असलेले एनएबीएच प्रमाणित हे नेत्र रुग्णालय आहे. सन २००० पासून १६ लाख रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. तर दोन लाखाहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रेटीना व कॉर्निया उपचार, लॅसिक व लेझर दृष्टी सुधारणा, ग्लॉकोमा व्यवस्थापन, बाल नेत्र चिकित्सा, ओक्यूलोप्लास्टि, ड्राय आय उपचार केले जातात. चिंचवड शाखेत दररोज शंभर हून अधिक रुग्णांची तपासणी केली जाते. महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू असलेले हे नेत्रालय आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत तसेच हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांसोबत टायप आहे. अठरा वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेले सुपर स्पेशालिस्ट येथे कार्यरत आहेत. असे कदम म्हणाले
शिबिराच्या आयोजनासाठी यशवंत बो-हाडे , नंदकुमार सातुर्डेकर, राधा सातुर्डेकर, कोमल माटे, रेश्मा बोबडे यांनी पुढाकार घेतला होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
31.1 ° C
31.1 °
31.1 °
62 %
0kmh
20 %
Thu
33 °
Fri
38 °
Sat
38 °
Sun
38 °
Mon
38 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!