21.1 C
New Delhi
Wednesday, November 5, 2025
Homeआरोग्यसांगवी येथील मोफत महाआरोग्य शिबिराचा ३५० हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

सांगवी येथील मोफत महाआरोग्य शिबिराचा ३५० हून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

पिंपरी, – : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे सांगवी गावठाण येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ३५० हून अधिक नागरिकांनी विविध तपासण्यांचा लाभ घेतला. यावेळी १०० हून अधिक नागरिकांचे आयुष्मान कार्डे तयार करून देण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली ढोणे यांच्या हस्ते,माजी महापौर माई ढोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती सागळे, नोडल अधिकारी डॉ. वैशाली भामरे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रज्ञा बडगे, फिजिशियन डॉ. देवयानी लोंढे, बालरोगतज्ज्ञ डॉ. दीपक पाटील उपस्थित होते.

या शिबिरामध्ये नागरिकांसाठी दंत तपासणी, नेत्र तपासणी, कान-नाक-घसा तपासणी, बालकांची व किशोरवयीन मुलांची तपासणी, गर्भवती महिलांची तपासणी, वृद्ध नागरिकांची तपासणी, मानसिक आरोग्य तपासणी, लहान मुलांचे लसीकरण, रक्त तपासणी तसेच औषधांचे वितरण अशा सर्व सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. याशिवाय नागरिकांना आयुष्मान कार्डे व आभा कार्डे काढून देण्यात आले. भूलरोगतज्ज्ञ डॉ. मोनाली क्षीरसागर यांनी उपस्थितांना सीपीआरचे प्रात्यक्षिक करून आवश्यक ते मार्गदर्शन केले.

…….

महाआरोग्य शिबिरामध्ये नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि जनजागृती उपक्रम याद्वारे नागरिकांना सर्वसमावेशक सेवा देणे हा महापालिकेचा प्रयत्न आहे. अशा शिबिरांमुळे नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यास मोठी मदत मिळते.
विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
…….

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयांमधील व मोफत शिबिरांमधील सेवा नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत. प्रतिबंधात्मक तपासण्या आणि लसीकरण यामुळे नागरिकांचे आरोग्य अधिक सक्षम करण्याचा आमचा मानस आहे.
डॉ. लक्ष्मण गोफणे, वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
21.1 ° C
21.1 °
21.1 °
78 %
1.5kmh
40 %
Tue
25 °
Wed
31 °
Thu
31 °
Fri
29 °
Sat
29 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!