30.2 C
New Delhi
Tuesday, September 9, 2025
Homeआरोग्यएम.डी./एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर

एम.डी./एम.एस. परीक्षेचा निकाल जाहीर

राज्यात अव्वल क्रमांक पटकावत डॉ. प्रीत शहा आणि डॉ. रवी केसवानी हे ठरले ‘गोल्ड मेडलिस्ट’

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे. पदव्युत्तर एम.डी./एम.एस. परीक्षेत येथील दोन विद्यार्थ्यांनी राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. डॉ. प्रीत शहा आणि डॉ. रवी केसवानी यांनी अनुक्रमे मेडिसिन आणि ऑर्थोपेडिकमध्ये ‘गोल्ड मेडल’ मिळवून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यांच्या या घवघवीत यशामुळे महापालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचेही कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांचे यश संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरले आहे.

पिंपरी, – : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील सन २०२१ च्या पदव्युत्तर एम.डी./एम.एस. या अभ्यासक्रम परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या अभ्यासक्रमातील एकूण ३३ पैकी २१ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यात अव्वल क्रमांक पटकावत डॉ. प्रीत शहा आणि डॉ. रवी केसवानी हे ‘गोल्ड मेडलिस्ट’ ठरले आहेत. यानिमित्ताने सन २०२१ बॅचचा निरोप समारंभ पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या उपस्थितीत पार पडला.

या वेळी बोलताना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्व यशस्वी डॉक्टरांचे विशेष अभिनंदन केले. तसेच सर्जरी, मेडिसिन व बालरोग या तीन विभागांतील नेत्रदीपक यश मिळवणाऱ्या डॉक्टरांचे विशेष कौतुक केले. या प्रसंगी सहानुभूती, मानवीय दृष्टीकोन व नैतिक मूल्ये ठेवून रुग्णसेवा करण्याचा सल्ला देखील आयुक्त सिंह यांनी सर्व डॉक्टरांना दिला.

महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाद्वारे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय परीक्षेत जनरल सर्जरी विभागातील ६ पैकी ६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विभागातील डॉ. प्रीत शहा राज्यात पहिल्या क्रमांकावर असून ‘गोल्ड मेडलिस्ट’ रठरले आहेत. तसेच, डॉ. अजिंक्य आक्रे यांनी राज्यात पाचवा क्रमांक मिळविला आहे.

जनरल मेडिसिन विभागात ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून डॉ. रवी केसवानी हा राज्यात पहिला क्रमांक पटकावत गोल्ड मेडलिस्ट ठरला आहे. तर बालरोग विभागात ४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून डॉ. मेहेरीन मीर हा राज्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. तसेच कान-नाक-घसा विभागात ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून डॉ. मनोज्ञा जाळवी या राज्यात सातव्या क्रमांकावर उत्तीर्ण झाल्या आहेत.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी यशस्वी डॉक्टरांचे अभिनंदन करताना त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या पालक व मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांचे आभार मानले. तसेच भावी आयुष्यात आरोग्य सेवेत कार्यरत घटकांशी योग्य संवाद साधून यशस्वी होण्याच्या शुभेच्छा दिल्या. तर अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांनी सर्व डॉक्टरांनाc शुभेच्छा देताना कामामध्ये पैसा सर्वोपरी न ठेवता कामाचे समाधान सर्वोपरी ठेवावे असा सल्ला दिला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
30.2 ° C
30.2 °
30.2 °
60 %
0.8kmh
8 %
Mon
30 °
Tue
35 °
Wed
36 °
Thu
36 °
Fri
36 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!