पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या ‘जय गणेश रुग्णसेवा अभियान’ अंतर्गत २०२४-२५ या आर्थिक वर्षात तब्बल ७२,४८३ रुग्णांना आरोग्यसेवा दिली गेली. ही सेवा मोफत तपासणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया, उपकरणे, श्रवणयंत्र वाटप अशा अनेक माध्यमांतून करण्यात आली आहे. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
आरोग्य क्षेत्रातील ठळक उपक्रम:
- कॉक्लियर इम्प्लांटसारख्या ८ जटिल शस्त्रक्रिया
- ५१५० कर्णबधिर रुग्णांना श्रवणयंत्र वाटप
- १२ लाख रुग्णांना ससून रुग्णालयात मोफत भोजन
- १३ रुग्णवाहिका – २४x७ मोफत सेवा
- ९२७८ मोफत पॅथॉलॉजी तपासण्या
- ७८३१ रुग्णांना मोफत फिजिओथेरपी आणि थेरपी सेवा
- ३७२२२ नेत्र तपासण्या व शस्त्रक्रिया
- ६७२ लहान मुलांच्या शस्त्रक्रिया
- मोफत ICU सेवा गणेशोत्सव काळात
याशिवाय विविध थेरपी, एमआरआय/सीटी स्कॅनवर सवलती, अपंगांना कृत्रिम अवयव, आरोग्य शिबिरे व शिक्षण क्षेत्रातही ट्रस्टचे भरीव योगदान आहे.
२० एप्रिल रोजी मोफत महाआरोग्य शिबिर:
पुण्यातील नू.म.वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात सकाळी ९ ते सायं. ५ या वेळेत सर्व प्रकारच्या तपासण्या व शस्त्रक्रियांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
ट्रस्टचा उद्देश:
“दानपेटीतील निधी पुन्हा समाजासाठी” हे उद्दिष्ट ठेवून ट्रस्ट सेवा देत आहे, असे ट्रस्टचे सरचिटणीस व आमदार हेमंत रासने यांनी सांगितले.