35.1 C
New Delhi
Saturday, June 6, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानएंजल वन एएमसीकडून एंजल वन सिल्‍व्‍हर ईटीएफ आणि एंजल वन सिल्‍व्‍हर ईटीएफ...

एंजल वन एएमसीकडून एंजल वन सिल्‍व्‍हर ईटीएफ आणि एंजल वन सिल्‍व्‍हर ईटीएफ एफओएफ लाँच

पुणे, : एंजल वन अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड या एंजल वन लिमिटेडच्‍या पूर्णत: मालकीच्‍या उपकंपनीने एंजल वन सिल्‍व्‍हर ईटीएफ आणि एंजल वन सिल्‍व्‍हर ईटीएफ एफओएफच्‍या लाँचची घोषणा केली. न्‍यू फंड ऑफर्स (एनएफओ) गुंतवणूकीसाठी ९ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झाल्‍या आहेत, तसेच ईटीएफसाठी एनएफओ १९ फेब्रुवारी २०२६ रोजी बंद होईल, तर एफओएफसाठी एनएफओ २३ फेब्रुवारी २०२६ पर्यत सुरू राहिल.

मौल्यवान धातू आणि औद्योगिक वस्तू अशा दोन्ही भूमिकांमुळे चांदीला महत्त्व प्राप्‍त होत आहे. सौर ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने आणि डेटा सेंटर्सकडून वाढणारी मागणी, तसेच मर्यादित पुरवठा यामुळे गुंतवणूकदारांचा कल चांदीकडे वाढत आहे. हा ट्रेण्‍ड निदर्शनास आणत एएमएफआय डेटामधून निदर्शनास येते की, डिसेंबर २०२५ मध्ये भारतात सिल्‍व्‍हर ईटीएफ एयूएमने ७२,००० कोटी रूपयांचा टप्पा ओलांडला आहे. ३१ जानेवारी २०२६ रोजी समाप्‍त झालेल्‍या गेल्या १० वर्षांच्या कालावधीत चांदीने (रुपयांमध्ये) २५.८ टक्‍के सीएजीआर दराने वाढ केली, ज्‍यामधून पोर्टफोलिओमध्‍ये विविधता आणण्‍यासाठी आणि महागाईच्‍या काळात देखील उत्तम फायदे देण्‍यासाठी चांदीची क्षमता दिसून येते.

या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत एंजल वन एएमसीचे एक्झिक्‍युटिव्‍ह डायरेक्‍टर व सीईओ श्री. हेमेन भाटिया म्‍हणाले, गुंतवणूकदार झपाट्याने बदलत असलेल्‍या जगानुसार आपला पोर्टफोलिओ बदलत आहेत, तसतसे विविधतेसाठी आणि स्थिरतेसाठी चांदीमधील गुंतवणूकीला प्राधान्‍य दिले जात आहे. आमच्या सिल्‍व्‍हर ईटीएफ आणि सिल्‍व्‍हर एफओएफच्या माध्यमातून आमचा गुंतवणूकदारांना या गतीशील मालमत्ता वर्गाच्या दीर्घकालीन क्षमतेमध्ये सहभागी होण्यासाठी सोपा, पारदर्शक आणि किफायतशीर मार्ग उपलब्ध करून देण्‍याचा मनसुबा आहे.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
35.1 ° C
35.1 °
35.1 °
29 %
1.2kmh
0 %
Sat
41 °
Sun
42 °
Mon
45 °
Tue
46 °
Wed
45 °

Most Popular

Recent Comments