30.7 C
New Delhi
Tuesday, July 21, 2026
Homeमनोरंजनतुमच्या घराच्या भिंतीतील वाळूची गोष्ट” या टॅगलाईनमुळे रंगले तर्कवितर्क

तुमच्या घराच्या भिंतीतील वाळूची गोष्ट” या टॅगलाईनमुळे रंगले तर्कवितर्क

युवा उद्योजक पुनीत बालन आणि अभिजीत भोसले यांची घोषणा

पुणे- मराठी चित्रपटसृष्टीत प्रचंड गाजलेल्या मुळशी पॅटर्न च्या यशानंतर आता मुळशी पॅटर्न-२ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. “तुमच्या घराच्या भिंतीतील वाळूची गोष्ट” अशी वेगळी आणि उत्सुकता वाढविणारी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

    पुनीत बालन स्टुडिओ आणि अभिजीत भोसले जेन्युन प्रॉडक्शन हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.. युवा उद्योजक पुनीत बालन, अभिजीत भोसले आणि अभिनेता प्रविण तरडे यांनी आज या चित्रपटाची घोषणा केली आहे.  ‘घराच्या भिंतीतील  वाळूची गोष्ट’ ही टॅग लाईन असल्याने या चित्रपटात नेमकी वाळूच्या संघर्षाची कथा पाहायला मिळणार आहे की, मुळशी पॅटर्न प्रमाणेच वाळू माफियांच्या वाढत्या जाळ्यावर आणि त्यामागील वास्तवावर भाष्य करण्यात येणार आहे, का सामान्य माणसाचे घराचे महाग होत च लेले ले स्वप्न याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत. ग्रामीण भागातील वास्तव, संघर्ष आणि व्यवस्थेतील काळी बाजू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रविण तरडे करणार असून. मुळशी पॅटर्न नंतर दुसरा भाग कधी येणार, याची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता होती. मात्र, प्रविण तरडे यांच्या देऊळ बंद-२ या चित्रपटाचे काम सुरू असल्याने मुळशी पॅटर्न-२ चे काम काहीसे लांबले होते.

आता मात्र ही प्रतीक्षा संपणार असून ‘पुनीत बालन स्टुडिओ’ आणि जेन्युन प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असून तो नेमका कधी प्रदर्शित होणार याची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

दरम्यान, या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार, पहिल्या भागातील कोणते कलाकार पुन्हा दिसणार, तसेच कथानकाची दिशा नेमकी काय असणार याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे मुळशी पॅटर्न-२ हा चित्रपट पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
light rain
30.7 ° C
30.7 °
30.7 °
66 %
4kmh
95 %
Tue
33 °
Wed
36 °
Thu
35 °
Fri
36 °
Sat
35 °

Most Popular

Recent Comments