38.9 C
New Delhi
Sunday, July 19, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानसोनालिकाची मे महिन्यातील आजपर्यंतची सर्वाधिक एकंदर १७,२०४ ट्रॅक्टर केली विक्री

सोनालिकाची मे महिन्यातील आजपर्यंतची सर्वाधिक एकंदर १७,२०४ ट्रॅक्टर केली विक्री

पुणे – : भारतातील नंबर १ ट्रॅक्टर निर्यात ब्रँड असलेल्या सोनालिका ट्रॅक्टर्सने मे महिन्यातील आतापर्यंतची सर्वाधिक १७,२०४ ट्रॅक्टरची विक्री नोंदवत आर्थिक वर्ष २०२७ मध्ये आपल्या गतीला वेग दिला आहे. तसेच एकूण २१ टक्के वाढ नोंदवून उद्योगाच्या कामगिरीलाही मागे टाकले आहे. सोनालिकाचा हा नवा मैलाचा दगड शेतकऱ्यांपर्यंत ‘जीतने का दम’ पोहोचवण्यावर ब्रँडने सातत्याने दिलेला भर आणि भारताला कृषी महासत्ता बनवण्याच्या उद्देशाने शेतीच्या दृष्टीने कार्यक्षम आणि समृद्ध राष्ट्र निर्माण करण्यात त्याची भूमिका अधोरेखित करणारा आहे. याशिवाय कंपनीने भारतातील आगामी खरीप हंगामाच्या तयारीचा एक भाग म्हणून आजपर्यंतच्या सर्वाधिक मासिक १७,०२९ ट्रॅक्टर उत्पादनाची नोंद केली आहे.

मान्सून हा अनेक दशकांपासून भारतीय शेतीमध्ये आशावादाला चालना देणारा एक महत्त्वाचा घटक आहे. मात्र, शेतकरी आता सुधारित पीक व्यवस्थापन आणि चांगल्या उत्पादनासाठी सिंचनाच्या वाढत्या तीव्रतेवर अवलंबून राहत असून तांत्रिकदृष्ट्या प्रगत ट्रॅक्टर शोधत आहेत. भविष्यासाठी सज्ज असलेल्या उत्पादनांच्या माध्यमातून ‘जीतने का दम’वर असलेल्या बळकट विश्वासाच्या आधारे सोनालिका ट्रॅक्टर्स तज्ज्ञ अभियांत्रिकीसह डिझाइन केलेले शक्तिशाली ट्रॅक्टर आणि जगातील नंबर १ ट्रॅक्टर प्लांटमध्ये विकसित करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या इंजिनांसह शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी सज्ज आहे. ग्रामीण बाजारपेठांमध्ये कंपनीची वाढणारी उपस्थिती आणि अविरतपणे ग्राहकांच्या समाधानावर लक्ष केंद्रित केल्याने देशाच्या कृषी वाढीच्या प्रवासात विश्वासू भागीदार म्हणून तिचे स्थान आणखी मजबूत झाले आहे.

इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक श्री. रमण मित्तल म्हणाले, “उद्योगाच्या कामगिरीला मागे टाकत एकूण २१ टक्के वाढीच्या आधारे मे महिन्यातील आतापर्यंतच्या सर्वाधिक १७,२०४ ट्रॅक्टर विक्रीची नोंद करण्याचा आम्हाला आनंद होत आहे. भारतीय शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी उमेदीने तयारी आधीच सुरू केली असून अधिक आत्मविश्वासाने यांत्रिकीकरणाची निवड करीत आहेत, याचा हा एक धाडसी संकेत आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही आजपर्यंतच्या सर्वाधिक १७,०२९ ट्रॅक्टरच्या मासिक उत्पादनाची नोंद केली आहे.

केवळ संख्येपेक्षाही भारतीय शेतीतील चिरस्थायी चैतन्य ही आम्हाला सर्वाधिक प्रेरणा देणारी गोष्ट आहे. इथे प्रत्येक हंगामाची सुरुवात या विश्वासाने होते, की उद्याचे पीक आजच्यापेक्षा चांगले असेल आणि विकास नेहमीच शक्य आहे. शाश्वत प्रगती ही सातत्य व लवचिकतेवर आधारित असते आणि शेतकऱ्यांच्या हाती अधिक अधिकार देण्यासाठी ती कटिबद्ध असते, यावर आमचा नेहमीच विश्वास राहिला आहे. आयटीएलमध्ये ही आमची सर्वात मोठी ताकद आहे. तिच्यामुळेच पारंपरिक समजुतींना आव्हान देणे आणि ‘जीतने का दम’ या भावनेने नवीन मापदंड स्थापित करणे आम्हाला शक्य होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
38.9 ° C
38.9 °
38.9 °
34 %
2.7kmh
89 %
Sun
39 °
Mon
36 °
Tue
30 °
Wed
31 °
Thu
28 °

Most Popular

Recent Comments