14.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
Homeआरोग्यदोन आठवड्यांत नेफ्रोलॉजिस्टची नेमणूक करा

दोन आठवड्यांत नेफ्रोलॉजिस्टची नेमणूक करा

YCM रुग्णालयाच्या गलथान कारभारावर आमदार अमित गोरखे आक्रमक

पिंपरी-चिंचवड:पिंपरी-चिंचवड शहरातील बहुसंख्य नागरिक उपचारांसाठी यशवंतराव चव्हाण स्मृती (YCM) रुग्णालयावर अवलंबून आहेत, मात्र तेथे गंभीर आरोग्य व्यवस्थापनाचा फटका जाणवत आहे. रुग्णालयात डायलिसिस सेंटर कार्यरत असतानाही, डायलिसिस नंतरच्या गंभीर किडनी विकारांसाठी आवश्यक असणाऱ्या नेफ्रोलॉजिस्ट (किडनी तज्ज्ञ) डॉक्टरांची मोठी कमतरता आहे.

या गंभीर त्रुटीमुळे गरीब आणि सामान्य नागरिकांना उपचारांसाठी भटकंती करावी लागत आहे, तसेच त्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. ही बाब अत्यंत गंभीर आणि पूर्णपणे अस्वीकार्य आहे.
या पार्श्वभूमीवर, आमदार अमित गोरखे यांनी माननीय आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांना कठोर सूचना दिल्या आहेत की, येत्या दोन आठवड्यांच्या आत नेफ्रोलॉजिस्टची (किडनी तज्ज्ञ) नेमणूक तातडीने करावी. तसेच, किडनीसारख्या गंभीर आजारांसाठी आवश्यक असणारी औषधे रुग्णालयात पुरेसा प्रमाणात उपलब्ध करून नागरिकांना योग्य उपचार मिळतील याची दक्षता घ्यावी.

याशिवाय, आमदार गोरखे यांनी पूर्वी मागणी केल्यानंतर आयुक्तांनी आयुर्वेदिक ओपीडी सुरू करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र, महानगरपालिका प्रशासन या महत्त्वपूर्ण आरोग्य सेवेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
आमदार गोरखे यांनी स्पष्ट केले की, शासकीय रुग्णालय असूनही नागरिकांना उपचारांसाठी दुसऱ्या ठिकाणी जावे लागणे, ही महानगरपालिकेची गंभीर चूक आणि अक्षम्य गलथानपणा आहे. त्यांनी आयुक्तांकडे या समस्येवर तात्काळ आणि ठोस उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
14.1 ° C
14.1 °
14.1 °
72 %
0kmh
0 %
Wed
20 °
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!