पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालय आयोजित ‘एएमएम क्लासिक सिनियर श्री – २०२५’ चा ‘किताब शिवम वडार याने ‘एएमएम क्लासिक जुनिअर श्री – २०२५’ चा किताब कृष्णा फडतरे याने प्राप्त केला. ‘एएमएम मेन्स फिजिक सीनियर श्री – २०२५’ वर रंजन धुमाळ याने नाव कोरले. ‘एएमएम मेन्स फिजिक ज्युनिअर श्री – २०२५’ चा मान आकाश घोरपडे याने मिळविला. राज्यभरातील महाविद्यालयीन शरीरसौष्ठवपटूसाठी असलेल्या खुल्या गटात ‘एएमएम क्लासिक हेल्थ क्लब श्री – २०२५’ चा किताब ऋषिकेश बिरेदार याने तर ‘एएमएम मेन्स फिजिक हेल्थ क्लब श्री – २०२५’ चा किताब अक्षय वाघ याने पटकाविला. ह्या सहा शरीरसौष्ठवपटूनी यंदाच्या ‘एएमएम श्री’ किताबावर आपली मोहोर उमटवली. स्पर्धेचे हे सलग पाचवे वर्ष आहे.
स्पर्धेचे उदघाटन माजी उपमहापौर निलेशदादा मगर व मिस्टर इंडिया जुनिअर किताबाचा मानकरी दिव्यांक आरु ह्यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.नितीन घोरपडे होते. या स्पर्धेसाठी पंच म्हणून डॉ.शिवाजी भिंताडे व विवेक माने यांनी काम पहिले. कार्यक्रमास राष्ट्रीय खेळाडू संग्रामसिंग पाटील, सर्फराज पठाण, संदीप भगत, उपप्राचार्य डॉ.प्रशांत मुळे, प्रा.विलास शिंदे, प्रा.अनिल जगताप, डॉ.नाना झगडे, डॉ.नामदेव भुजबळ, कॅप्टन धीरज देशमुख, डॉ.संजय झगडे,डॉ.दत्तात्रय संकपाळ, प्रा.अनिल दाहोत्रे, प्रा.काशिनाथ दिवटे, डॉ.अण्णासाहेब निंबाळकर, प्रा.गौरव शेलार, प्रा.ऋषिकेश मोरे, ऍड.प्रितेश ओव्हाळ हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा.प्रितम ओव्हाळ यांनी केले, तर आभार उपप्राचार्य डॉ.प्रशांत मुळे यांनी मानले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :-
क्लासिक सिनिअर श्री (ग्रुप – ए)
शिवम वडार (प्रथम) सार्थक पाटील (द्वितीय) सचिन मोरे (तृतीय)
(ग्रुप – बी)
साजन जाधव (प्रथम) रितेश चव्हाण (द्वितीय) प्रणय नाईक (तृतीय)
मेन्स फिजिक सीनियर श्री (ग्रुप – ए)
आदित्य गायकवाड (प्रथम) ऋषिकेश कुदळे (द्वितीय) यश कुंभारकर (तृतीय)
उत्कर्ष राठोड (बेस्ट अपकमिंग) रोहन बोत्रे (बेस्ट अपकमिंग)
(ग्रुप – बी)
रंजन धुमाळ (प्रथम) गणेश चव्हाण (द्वितीय)
नाना बांदल (तृतीय) ओमकार कापसे (बेस्ट अपकमिंग) आदित्य पांधरे (बेस्ट अपकमिंग)
क्लासिक ज्युनिअर श्री (ग्रुप – ए)
कृष्णा फडतरे (प्रथम) प्रणव येवते (द्वितीय)
नरेंद्र गडकरी (तृतीय)
(ग्रुप – बी)
जैद शेख (प्रथम) मनीष काळे (द्वितीय)
अभिषेक कुंजीर (तृतीय)
मेन्स फिजिक ज्युनिअर श्री (ग्रुप – ए)
आकाश घोरपडे (प्रथम) रितेश माने (द्वितीय)
तन्मय भोसले (तृतीय) शुभम शेरेकर (बेस्ट अपकमिंग)
(ग्रुप – बी)
गणेश गायकवाड (प्रथम) कोहिनूर थोरात (द्वितीय) आयुष साळुंखे (तृतीय)
सुमित कथारे (बेस्ट अपकमिंग) तानाजी चव्हाण (बेस्ट अपकमिंग)
मेन्स फिजिक श्री (हेल्थ क्लब)
अक्षय वाघ (प्रथम) किरण कुकुटवाड (द्वितीय) कार्तिक नागवडे (तृतीय)
ओम लोखंडे (बेस्ट अपकमिंग) अथर्व जाधव (बेस्ट अपकमिंग) विश्लेष शिंदे (बेस्ट अपकमिंग) वैभव बुडूखाडे (उत्तेजनार्थ पारितोषिक) ऋषिकेश हुलगे (उत्तेजनार्थ पारितोषिक)
क्लासिक श्री (हेल्थ क्लब)
ऋषिकेश बिरेदार (प्रथम) सुरज सरोज (द्वितीय) मनोज मोरे (तृतीय) प्रथमेश नवले (बेस्ट अपकमिंग) बालाजी कैलास (बेस्ट अपकमिंग) आशिष खोत (बेस्ट अपकमिंग)
तेजस वीर (बेस्ट अपकमिंग) कुणाल चव्हाण (बेस्ट अपकमिंग) रोहित अहिरे (उत्तेजनार्थ पारितोषिक) साहिल कारंडे (उत्तेजनार्थ पारितोषिक)