‘
पुणे – संपूर्ण पश्चिम भारतातील युवा क्रीडा प्रतिभेला वाव देण्याच्या उद्देशाने भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) वतीने येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग पुणे, येथे आयोजित खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन (कीर्ती ) कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठातील सुसज्ज अशा क्रीडा संकुलात आत्तापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांनी आपली क्रीडा प्रतिभा दाखवली आहे. शनिवारी मोठ्या उत्साहात बाॅक्सिंग क्रीडा प्रकाराचे उद्घाटन झाले. ज्यानंतर विद्यार्थ्यांची साईच्या अधिकाऱ्यांकडून विविध स्वरांवर चाचणी घेण्यात आली. भारत सरकारच्या या निवड प्रक्रियेसाठी पुण्यासह राज्यभरातील असंख्य विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करताना विद्यापीठात पालकांसह धाव घेतली आहे. तसेच, त्यांनी विद्यापीठातील क्रीडा सुविधांची स्थुती करताना कर्मचाऱ्यांनी केलेल्या पाहुणचाराबद्दल समाधान व्यक्त केले.
आता २४ जून रोजी फुटबॉल आणि खो-खो तर अखेरच्या २५ जून रोजी कबड्डी आणि व्हॉलीबॉल या क्रीडा प्रकारांसाठी खेळाडूंचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. तरी अद्यापही या निवड चाचणी कार्यक्रमात राज्यातील युवा व प्रतिभावान खेळाडूंनी आवर्जून भाग घ्यावा, व नोंदणीसाठी श्री. सुनील मोरे यांच्याशी ९७६३३९८१३६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ‘एमआयटी एडीटी’ विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रमुख प्रा.डाॅ.सुराज भोयार, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा विभाग संचालक प्रा.पद्माकर फड यांनी केले आहे.