चॅम्पियन्स ट्रॉफीतील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान pakistan संघासह व्यवस्थापनही टार्गेटवर आहे. या निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू संताप व्यक्त करत आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा आतापर्यंतचा प्रवास लज्जास्पद राहिला आहे. घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून पहिला सामना हरल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताकडून पराभव पत्करावा लागला. हे दोन्ही पराभव लाजिरवाणे आहेत कारण त्यात पाकिस्तान कधीच प्रबळ दिसला नाही.
फलंदाजी असो की गोलंदाजी, प्रत्येक क्षेत्रात पाकिस्तानी संघ फ्लॉप ठरला आहे. आता संघ चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. अशा स्थितीत पाकिस्तान संघातील माजी खेळाडूंना राग येणे स्वाभाविक आहे. शोएब अख्तर याने व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित करत त्यांना मेंदू नसल्याचे सांगितले. वसीम अक्रम, इंझमाम उल हक आदी दिग्गजांनीही पीसीबी व्यवस्थापनावर टीका केली. भारताकडून पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तर याने अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. एका व्हिडिओमध्ये तो पीसीबी व्यवस्थापनावर चांगलाच चिडलेला दिसला. तो म्हणाला, “मी अजिबात निराश नाही, कारण मला माहित आहे की काय होणार आहे. जग ६ गोलंदाजांसह खेळत आहे आणि आम्ही ५ गोलंदाजही खेळवत नाही.
हे सुज्ञ व्यवस्थापन नाही. मी खूप निराश झालो आहे. आता मुलांना (खेळाडू) काय सांगायचे, त्यांना काही कळत नाही. जसे व्यवस्थापन असेल, तसेच खेळाडूही असतील. हे निराशाजनक आहे. त्यांच्याकडे (पाकिस्तानी खेळाडू) विराट कोहली, रोहित शर्मा किंवा शुभमन गिलसारखे कौशल्य नाही.